नांदेड। जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा अभियानात फ्रीडम जॉईन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सात हजार विद्यार्थी सहभागाने फ्रीडम जॉईन रॅली लक्षवेधी ठरली. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदिर, शिवाजीनगर, आयटीआय, व्हीआयपी रोड मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचली.
या रॅलीच्या सुरूवातीस वंदे मातरम गीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने सादर करण्यात आले. हर घर तिरंगाबाबत जनजागृतीसाठी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. पोलिसांच्या बॅंड पथकाच्या देशभक्तीपर धूनने परिसरातील सर्वांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखवली.
ध्वनिक्षेपक लावलेले फिरत्या वाहनांसह रॅलीत नॅशनल कॅडेट कोर, स्काऊट गाईड, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी, रोलर स्केटिंग खेळाडू, माध्यमिक प्राथमिक शाळांचे 12 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी तिरंगी ध्वजासह या रॅलीत सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या घोषणांसह एनसीसी विद्यार्थीनी क्रीडा संकुल पर्यंत फडकवत नेलेला शंभर फूट लांबीचा तिरंगा" हर घर तिरंगा"चा संदेश देत होता. रॅलीत ठिकाणी झालेली ललीत व प्रयोगजीवी कला संकुल विद्यापीठामार्फत सादर पथनाट्य, गीते व ललीत कला अकादमी नांदेडच्या वतीने सादर भारत मातेचा देखावा, देशभक्तीपर नृत्यांनी लक्ष वेधून घेतले.
ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थीनी "हर घर तिरंगा व ७५" आकारात रचना करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा अभियानाचा संदेश दिला. या रॅलीत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व विद्यापीठासह अनेक महाविद्यालयीन प्राध्यापक, शालेय शिक्षकांची उपस्थिती होती. शेवटी स्काऊट गाईड मुलींनी हर घर तिरंगा राखी मान्यवरांच्या हातावर बांधल्यानंतर कुलगुरूसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी तिरंगा ध्वज विद्यार्थीनींच्या हाती दिला.
या रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपजिल्हाधिका