पार्डीच्या मुलींना " हिरक पंख " पुरस्कार प्राप्त ...NNL


अर्धापुर, निळकंठ मदने।
तालुक्यातील पार्डी (म )येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच मुलींना हिरक पंख पुरस्कार प्राप्त झाले आहे .महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय हिरक पंख चाचणी शिबिरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी म .शाळेतील पाच मुलींनी सहभाग नोंदवला होता .

यामध्ये कु .नम्रता मदने ,शिवानी साबळे ,गुंजन मरकुंदे , ऋतुजा मरकुंदे ,सिद्धी मरकुंदे या पाच मुलींनी बुलबुल प्रवेश घेतल्यानंतर तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिबिरात सहभाग घेतला होता .हिरक पंख या चाचणीत यशस्वी झाले होते .महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाइड्स कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालात पार्डी म .च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच मुलींना हिरक पंख पुरस्कार प्राप्त झाले आहे .सदरील परीक्षेसाठी प्लॉक लिडर शिक्षिका उषा नळगिरे यांचे मार्गदर्शन लाभले होते .तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेश देशमुख ,नामदेव भोसले ,रमेश पावडे ,योगाची कल्याणकर ,शोभा देशमुख ,मंगला सलामे यांचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाला बद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी मुलींचे कौतुक केले आहे .

पार्डी म .शाळा गुणवत्ता बरोबर स्काऊटस गाईडस चळवळीत सक्रिय सहभाग घेते अर्धापुर तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी रुस्तुम ससाणे यांनी व्यक्त केले आहे .तसेच शाळा नाविन्यपूर्ण उपक्रमात सदैव सहभागी राहते असे मत केंद्रप्रमुख विकास चव्हाण यांनी म्हटले आहे .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी