भोकरफाटा ते अर्धापूर शहरातून तब्बल ८ कि मी अंतराच्या पदयात्रेत अशोक चव्हाण यांची उपस्थिती -NNL


अर्धापूर निळकंठ मदने।
भोकरफाटा ते अर्धापूर व अर्धापूर शहरातील छोट्या-मोठ्या रस्त्यावरुन तालुका काॅग्रेसने आझादी गौरव पदयात्रेचे शुक्रवारी आयोजन केले होते,या पदयात्रेत कार्यकर्त्यांसोबत दस्तुरखुद्द माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पायी चालल्याने दुसऱ्या फळीतील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनाही पुर्ण यात्रेत पायी चालावे लागले, यावेळी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काॅग्रेसचे मोठे योगदान असून,काॅग्रेसच्या शेकडो  देशभक्तांनी बलीदान दिल्याने देशाला स्वातंत्र्य मिळाले असून,त्यामुळे काॅग्रेसला गौरवशाली इतिहास असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री  अशोकराव चव्हाण यांनी केले.

शुक्रवारी सकाळी १० वा.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आझादी गौरव पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला, यावेळी अशोकराव चव्हाण पायी चालत पदयात्रेत सहभागी झाल्यावर जागोजागी त्यांचे शाल,हार देऊन स्वागत करण्यात आले, याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,शहराध्यक्ष राजेश्वर शेटे,अभिजीत सपकाळ,सुरेंद्र घोडजकर,मंगाराणी अंबुलगेकर, बी आर कदम, बाळासाहेब रावणगावकर, युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर,उध्दवराव पवार,जगदीश पाटील भोसीकर,मारोती शंकतिर्थकर,मदन देशमुख, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,मुसव्वीर खतीब, प्रवीण देशमुख,नासेरखान पठाण,शामराव टेकाळे, पप्पू बेग,यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी भोकरफाटा येथे अशोकराव चव्हाण म्हणाले की,देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काॅग्रेसच्या शेकडो स्वातंत्र्य विरांनी बलीदान दिले आहे, त्यामुळे देश अमृत महोत्सव साजरा करीत असल्यांने काॅग्रेसने राज्यात या पदयात्रेचे आयोजन केले आहे, देशाला कशाप्रकारे स्वातंत्र्य मिळाले हे युवा पीढीला समजणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी प्रस्ताविकात कार्यक्रमाची रुपरेषा सांगून केंद्र सरकारच्या विक्रमी दरवाढीचा जाहीर निषेध केला,या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन जिल्हा सचिव निळकंठराव मदने यांनी केले.

यावेळी व्यंकटराव कल्याणकर,गाजी काझी, रणजीतसींह कामठेकर, अॅड सुभाष कल्याणकर, भगवान तिडके,मनोज गिमेकर, राजकुमार जाधव,उतमराव लोमटे,अशोक सावंत, ज्ञानेश्वर राजेगोरे, शंकरराव टेकाळे,सोनाजी सरोदे, व्यंकटी राऊत, खांड्रे,पंडित लंगडे, केशवराव इंगोले,बाळू पाटील धुमाळ,अमोल डोंगरे, संजय लोणे,बाळू लोणे, पिंन्टू स्वामी,ओमकार वटमे,डॉ आनंद शिंदे,शंकर ढगे,राजाराम पवार, राजाराम गायकवाड,बंदेअलीखा पठाण, सलीम कुरेशी,डॉ मनोज राठोड,अबूझर बेग,आनंदराव कपाटे, नवनाथ कपाटे,डॉ विशाल लंगडे,काजी मुख्तारोदीन, बालाजी क्षीरसागर, सतोष हाफगुंडे, गोविंद गोदरे,नामदेव दुधाटे,उमेश सरोदे, बालाजी कदम, यशवंत राजेगोरे,पंढरीनाथ क्षीरसागर,राजू कल्याणकर,शेख मकसूद,शेख मोहसीन,शेरु पठाण यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी