नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील भायेगाव येथे भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा हा राष्ट्रीय उपक्रम राबविला आहे या अनुषंगाने भायेगाव ग्रामपंचायत च्या वतीने तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करून हर घर तिरंगा या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग घेण्याचे ठरविण्यात आले.
सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, यांच्या हस्ते गावाच्या नागरिकांना तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले तसेच दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत हे तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक सुरक्षित ठिकाणी व ध्वज संहितेचे पालन करून हा राष्ट्रीय उपक्रम राबवावा असे आवाहन सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.एस.वाकोरे, उपसरपंच बालाजी कोल्हे,शंकर खोसडे,शिवाजी खोसडे, गौतम भालेराव,विठ्ठलराव खोसडे, गोविंदराव कोल्हे, चेअरमन गणपतराव कोल्हे, सुरेश कोसडे,बालाजी कोल्हे,पांडुरंग कोचार, राम कोल्हे, नामदेव खोसडे, सोपान कोल्हे,आनंदा मेकाले संभाजी मेकाले, गुणाजी खोसडे,शंकर कोल्हे ,राम कोचर,गंगाधर खोसडे, राम कोचार गंगाधर खोसडे, रेश्माजी खोसडे, तलाठी सूर्यवंशी व गावकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.