गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांसह प्रवाशांना करावा लागतो जीवघेणा प्रवास
हिमायतनगर। हिमायतनगर तालुक्यातील घारापुर दिघी हिमायतनगर येणाऱ्या रस्त्यावरून अर्धापूर तामसा फुलसावंगी एन एच 752 आय हा नॅशनल हायवे रस्ता जात आहे. या रस्त्याचे काम सुरू होऊन तीन वर्षे उलटले असल्याची तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. टेंभुर्णी-दिघीच्या नाल्यावरच्या पुलाचे बांधकाम केले नसल्यामुळे तेथील शेतकरी यासह प्रवाशांना जीव मुठीत धरून बोटीवरून जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे.
केंद्र सरकारने प्रवाशासह नागरिकांची दुर्दशा थांबावी आणि चांगल्या उच्च दर्जाचे रस्ते बनवावे म्हणून वाहतूक उड्डाण मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून हा रस्ता मंजूर केला. गेल्या 3 वर्षांपासून होत असलेल्या रस्त्यावर अनेक वर्षापासून पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने मार्गक्रमण करताना ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. सध्या इसापूर धरणाचे वक्रद्वारे पेनगंगा नदी पात्रात पाणी सोडल्याने या पाण्याचा फटका येतील शेतकरी व प्रवाशांना बसत असून, दळणवळणाचे वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे. या बाबीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी या रस्त्याचे काम पाहणारे कणिष्ट अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता फोन नोटरीचेबल येत आहे.