सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव निमित्त नांदेड दिग्गजांची मांदियाळी
नांदेड।नांदेडकरांना विविध प्रकारची संगीत व नृत्यांची सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून दरवर्षीप्रमाणे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान कै- शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ- सान्वी (भरत) जेठवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली-
शहरात 14 ते 16 ऑगस्ट रोजी होत असलेले सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव देश-विदेशातील नामवंत कलाकार सहभागी होणार असून स्पर्धेत भाग घेणे बरोबर भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील शास्त्रीय नृत्य लोकनृत्य व विविध संगीत शैलीचे सादरीकरण हे कलाकार या मंचावर करणार असल्याने नांदेड करांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे- ही संधी निर्माण करून दिली ती सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा नांदेडमध्ये उमटवणारी सप्तरंग सेवाभावी संस्था] लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स] संस्कृती मंत्रालय भारत सरकार] नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने-
सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाची विभागणी दोन भागात करण्यात आली असून त्यात सकाळी 10 ते सायंकाळी 5-30 वाजेपर्यंत स्पर्धा घेतल्या जाणार आहेत तर दुसऱ्या भागात सायंकाळी 5-30 ते पुढे महोत्सवाचे आयोजन होणार आहे- विशेष म्हणजे 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता विशेष लावणी बिन बायकांचा तमाशा] मुंबई आणि शाहीर रामानंद उगळे] जालना यांचं विशेष सादरीकरणाचे आयोजन देखील यात करण्यात आले आहे-
14 ऑगस्ट रोजी या महोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री श्री vk डी- पी- सावंत] विधान परिषद सदस्य vk श्री अमरनाथ राजुरकर] महापौर सौ जयश्री पावडे] विधानसभा सदस्य vk श्री मोहनराव हंबर्डे] जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर] मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सौ वर्षाताई घुगे] आयुक्त मनपा डॉ सुनील लहाने] vIपर जिल्हाधिकारी श्री कुशाल सिंह परदेशी यांच्या उपस्थितीने या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे-
या भव्य महोत्सवाचे समारोपीय अध्यक्ष स्थान नवनिर्वाचित खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वीकारला आहे] तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्री हेमंत पाटील ] विधान परिषद सदस्य vk श्री बालाजी कल्याणकर] विधानसभा सदस्य vk श्री श्यामसुंदर शिंदे पाटील ] विधानसभा सदस्य vk श्री राजेश पवार] विधानसभा सदस्य vk श्री भीमराव केराम] विधानसभा सदस्य vk श्री डॉ तुषार राठोड] कुलगुरू स्वा रा ती म विद्यापीठ डॉ उद्धव भोसले] श्री- गणेश महाजन यांची उपस्थिती लाभणार आहे-
महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने नृत्य क्षेत्रात भरीव कामगिरी करून नावलौकिक मिळवणारे सौ रत्नम जनार्धन नायर नागपूर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यासोबतच डॉ सानवी जेठवाणी यांचे लिंग परिवर्तन करणारे व भारतामध्ये लिंग परिवर्तन क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेले डॉक्टर नरेंद्र कौशिक दिल्ली यांना आरोग्यसेवा पुरस्कार तर सिंधी भाषा प्रचलित करण्याकरिता आपल्या संस्थेच्या माध्यमातून विविध सेवा देणारे नागपूर येथील श्री प्रताप मोटवानी यांना सिंधू भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नांदेड मध्ये कोरोना काळामध्ये व विविध समाजसेवेत अग्रेसर असणारे हॅपी क्लब नांदेड यांना युवा समाजसेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे
तीन दिवसीय राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वेगवेगळ्या नृत्य कलाप्रकार सादर होणार आहेत व भारतातून 6 प्रांतातील जवळपास 450 स्पर्धक व आंतरराष्ट्रीय पातळीचे गुरु यात आपला सहभाग नोंदविणार आहेत त्याचबरोबर विशेष प्रस्तुती म्हणून लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नांदेडच्या विद्यार्थ्यांचे नृत्य अविष्कार दररोज सायंकाळी 5-30 वाजता होणार आहे-
सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे हे lgkos वर्ष असून नांदेडकरांसाठी देश विदेशातील नामवंत व प्रसिद्ध कलाकार यांना पाहण्याची संधी मिळत असून या महोत्सवाला नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव अक्षय कदम] कार्यकारणी सदस्य शुभम बिरकुरे] नईम खान] जितेंद्र नरवाल] गणेश चांडोळकर यांनी केले आहे-