नांदेड| स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त लहुजी साळवे अनाथाश्रम धनगरवाडी येथे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रमात लायन्स परिवारातर्फे सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित उद्योजक सतीश सुगनचंदजी शर्मा हे होते. सुरुवातीला लायन्स झोनल सेक्रेटरी संजय अग्रवाल व लायन्स अन्नपूर्णा अध्यक्ष अरुणकुमार काबरा यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवकांत शिंदे, सचिव डॉ.अमोल हिंगमिरे, कोषाध्यक्ष सदाशिव महाजन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेकडे वाटचाल करीत असल्यामुळे तरुणांनी स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दिलीप ठाकूर यांनी याप्रसंगी केले. संस्थेचे अध्यक्ष लालबाजी घाटे यांनी प्रास्ताविक केले.
अनाथा श्रमातील मुलांनी व नर्सिंग कॉलेजच्या तरुणींनी एकापेक्षा एक सरस देशभक्ती गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या रंगारंग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय देवकरे यांनी केले. लायन्स परिवारातर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला, निबंध स्पर्धा व समूह गान स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. परीक्षक म्हणून लायन्स अन्नपूर्णा कोषाध्यक्ष सविता अरुण काबरा यांनी चोख कामगिरी बजावली. दिलीप ठाकूर, सतीश शर्मा, सविता काबरा यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा घाटे, अनुराधा वर्मा,दिपाली बुक्तरे, विजय सूर्यवंशी, सुमित तेरकर ,शरद पवार यांनी परिश्रम घेतले.