नांदेड, सुरेश लंगडापुरे। परमपूज्य स्वामी रामदेव जी महाराज यांचे निकटचे व लाडके शिष्य पूज्य स्वामी आनंददेवजी महाराज चांदोजी पावडे मंगल कार्यालयात कॅनॉल रोड ठिकाणी 10, 11 व 12 ऑगस्ट रोजी तीन दिवसीय समग्र योग साधना शिबिर सकाळी 5.00 ते 7.30 पर्यंत घेणार आहे. तसेच संध्याकाळी 5.00 ते 7.00 दरम्यान आयुर्वेदिक घरेलू उपचार, शुद्धीकरण क्रिया, रोग अनुरूप योगउपचार, मुद्रा,ॲक्युप्रेशर, शंकानिरसन ( प्रश्नोत्तर चर्चा ) आदीचा समावेश असेल.
सकाळच्या शिबिरात पूज्य स्वामी आनंद देव जी महाराज प्राणायाम, आसन,आसनासोबत प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम, योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, दंड, बैठक, ध्यान आदी विषयावर पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत तसेच रक्तदाब,मधुमेह, लठ्ठपणा सांधेदुखी, हृदयविकार आधी व्याधी वरती मार्गदर्शन राहणार आहे. शिबिराला जास्तीत जास्त नांदेडकरांनी भाग घ्यावा या दृष्टिकोनातून निशुल्क शिबिर नोंदणीसाठी 9405340718 या मोबाईल नंबरवर ती मिस कॉल करावयाचा आहे. कोरोनाच्या महामारी नंतर प्रथमच नांदेड शहरात योगाभ्यास मोठ्या प्रमाणात होत आहे तरी नांदेडकरांनी या संधीचा भरपूर लाभ घ्यावा असे पतंजली योग परिवारातर्फे सुचित करण्यात येत आहे.