नांदेड| सोमवंशीय क्षत्रीय कासार समाज मंडळ नांदेड व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फंड आळंदी यांच्यासंयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व अनुराधा दीदी शेट्टे पंढरपूरकर यांच्या ‘अमृतवाणीतून’ साकारणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा ज्ञानयज्ञाचा प्रारंभ आज दि. 4 रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला.
येथील माहेश्वरी भवनात आयोजित केलेल्या या सोहळ्याची 10 ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे. आज झालेल्या शुभारंभ सोहळ्यास आ.मोहनअण्णा हंबर्डे, महापौर जयश्रीताई पावडे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा,माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, मनपा सभागृह नेते ॲड.महेश कनकदंडे,माजी सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, प्रवक्ते संतोष पांडागळे, नगरसेवक राजू काळे, राजू यन्नम, दीपाली मोरे, ज्योती कल्याणकर, माजी जि.प.सदस्य मनोहर शिंदे, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सुजितसिंह ठाकूर, किशन कल्याणकर, परिस कासलीवाल यांची उपस्थिती होती.
सोमवंशीय क्षत्रीय कासार समाजाच्या नेत्या व माजी महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर, पारायण फंडाचे अध्यक्ष श्रीकांत इटकर, वेळापुरे, अशोक लोखंडे, अशोक आदमानेे, नेमीनाथ ढोके, नंदकुमार जगधने, सुकुमार लोखंडे, अक्षय ढोके, राजू मेनेे, दीपक मरळे, शोभा येवनकर, पल्लवी पेदे, अनिता आहेर, सुनिता पेदे, सुरेखा लोखंडे, ज्योती लोखंडे, सुलभा आदमाने,विद्या मेने, माया येवनकर, निर्मला येवनकर, सुनिता कुंभकर्ण यांच्यासह समाजाचे पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी या धार्मिक कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला.