उस्माननगर, माणिक भिसे। प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगी झेंडा फडकावून स्वतंत्र्याचा ७५ वा आमृत महोत्सव साजरा करावा असे आवाहन समता शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष अनिरूद्ध सिरसाळकर यांनी केले आहे.
शासनाच्या आदेशानुसार घर घर तिंरगा उपक्रमा अंतर्गत समता शिक्षण प्रसारक मंडळ मोठि लाठ चे कोषाध्यक्ष मा. अनिरुद्ध सिरसाळकर यांनी समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथे शिक्षक शिक्षिका यांना तिंरगा ध्वजाचे वाटप केले या वेळी अनिरुद्ध सिरसाळकर त्यांच्या पत्नी मंज्युषा सिरसाळकर/देशमुख विद्यालया चे पर्यवेक्षक राजीव अंबेकर श्रीमंती ज्योती सिरसाळकर, गणेश बोगेवार बी बी पाटील जे. एन. वाघमारे बसवेश्वर डांगे माधव स्वामी वर्षा देशमुख पी. पी इंगळे शिवचंद्र वारकडसह मारोती गोरे ,राम पवार सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.