हिमायतनगर। मुलचंद सुरजमलजी पिंचा यांचं हृदय विकाराच्या झटक्याने मध्यरात्री 1.15 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि 22 रोजी सांयकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
हिमायतनगर येथील प्रसिध्द व्यापारी, जेष्ठ नागरिक व श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे संचालक मुलचंद सुरजमलजी पिंचा यांचं वयाच्या 74 व्या वर्षी ऱ्हदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर दि 22 रोजी सायंकाळी 5 वाजता बोरगडी रोडवर असलेल्या वैकुंठधाम येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलं जाणार आहे. त्यांच्या मृत्यू पाश्चात्य, 4 मूल, पत्नी, सुना, नातवंडे, भाऊ, भाऊजयी, पुतणे असा मोठा परिवार आहे.
दोन मुलं डॉक्टर, एक प्राध्यापक, एक मुलगा विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. मुलचंद पिंचा हे आपल्या भागात जास्तीत जास्त रेल्वे कश्या सुरू होतील यासाठी नेहमी प्रयत्नशील होते. रेल्वे संदर्भात त्यांची धडपड चालू राहत असल्याने ते सर्वांचं परिचित होते. स्वर्गीय मुलचंदजी पिंचा यांनी चातुर्मास मध्ये 31 दिवसाचा निराहर उपवास केला होता, त्याग समर्पणाची त्यांची भावना होती. त्यांचं अचानक निधन झाल्याचं समजताच अनेकांना धक्का बसला आहे.