लोहा। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व अभाविप यांच्या संयुक्त विद्यमाने लोहा शहरात संत गाडगे महाराज शाळेचे मैदान ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ३७५ फुट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली..भारत माता की जय..वंदे मातरम ..हर घर तिरंगा ...या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.
अभाविप लोहा शाखेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोह्यात श्री संत गाडगे महाराज माध्यामिक व उच्च माध्यामिक विद्यालय लोहा याच्या संयुक्तिक पुढाकाराने ३७५ फूट राष्ट्रध्वज तिरंगा रॅली काढण्यात आली .माजी आ जेष्ट स्वातंत्र सेनानी भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला.यावेळी सौ मनीषा धोंडगे, प्राचार्य डॉ अशोक गवते, मुख्याध्यापक बोधगिरे, उपप्राचार्य दपके रॅली प्रमुख बी डी जाधव , संयोजक प्रा एन आर कुलकर्णी, अभाविप नांदेड विभागाचे संयोजक अद्वैत पार्डीकर, मुख्याध्यापक विलास नागेश्वर, मुख्याध्यापक दामोदर वडजे, मुख्याध्यापक एच जी पवार,मुअ संतोष भालेराव मुअ श्री लुंगारे यासह कर्मचारी शिक्षक प्राध्यापक यांची उपस्थिती होती
शाळेच्या मैदानावरून ३७५ फूट तिरंगा घेऊन विद्यार्थी निघाले यात संत गाडगे महाराज माध्यमिक -उच्च माध्यमिक शाळा, कै विश्वनाथराव नळगे विद्यालय, शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय लोहा, जिल्हा परिषद हायस्कुल लोहा या शाळेतील जवळपास तिन ते चार हजार विद्यार्थी , तसेच अभाविप चे कार्यकर्ते , पदाधिकारी यात सहभागी झाले होते.उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडेबीडीओ वाव्हूले,गट शिक्षणाधिकारी अधिकारी सोनटक्के, नगराध्यक्ष गजाजन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष दता वाले, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल,मुख्याधिकारी ऍड गंगाधर पेंटे , शिक्षण विस्तार अधिकारी टेकाळे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ चव्हाण , तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी नागरिक यांनी या रॅलीत सहभाग घेतला .
नगर पालिकेच्या वतीने रॅलीत सर्व विद्यार्थ्यांना बिस्टिक वाटप करण्यात आले नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील, मुख्याधिकारी पेंटे, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड यासह कर्मचारी पत्रकार यांच्या उपस्थितीत खाऊ वाटप करण्यात आले. गजानन कळसकर यांनी पाणी वाटप केले पर्यवेक्षक बी डी जाधव यांनी निवेदन व रॅली चे संचालण केले.रॅली साठी प्रा बालाजी चव्हाण, प्रा तेलंग, उप मुअ अनिल जाधव, गजानन जामगे तसेच एनसीसी प्रमुख आणि संत गाडगे महाराज शाळेतील शिक्षक प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. अद्वैत पार्डीकर अभाविप नांदेड विभागाचे संयोजक अद्वैत पार्डीकर , शिक्षक परिषदेचे प्रा एन आर कुळकर्णी हे रॅलीत सहभागी होते