सासरच्या ९ मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल
हिमायतनगर| शहरातील विवाहित मुलीस तिच्या सासरच्या मंडळींनी तू आम्हाला पसंत नाहीस.. तुला घरातील काम जमत नाही.... ज्यूसचे दुकान टाकण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये... असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच मारहाण करून उपाशीपोटी ठेवले अशी फिर्याद दिल्यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात सासरच्या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी मनीषा सतीश दुगाने वय २५ वर्षे हल्ली मुक्काम जनता कॉलनी हिमायतनगर हीच विवाह ४ वर्षांपूर्वी मध्ये उमरखेड तालुक्यातील बोरी येथील मुलाशी झाला होता. लग्नानंतर विवाहित घरातील सर्व काम सांभाळून घेत असल्याने दोघांचा संसार चांगला चालला, काही वर्षाने म्हणजे २०१९ ते २०२२ च्या काळात सासरच्या मंडळींनी संगनमत करून विवाहित मनीषा हिला कोणतेही कारण समोर करून त्रास देण्यास सुरुवात केली. तू आम्हाला पसंत नाहीस.. तुला घरातील काम जमत नाही.... ज्यूसचे दुकान टाढण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये... असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिच्यावर संशय घेऊन धमकी दिली.
अशी फिर्याद विवाहितेने दिल्यावरून आरोपी सतीश तुकाराम दुगाने वय २८ वर्षे नवरा, तुकाराम राजाराम दुगाने वय ६० वर्षे सासरा, शांताबाई तुकाराम दुगाने वय ५५ वर्षे सासू, रेणुका रघुनाथ कानोटे वय ४२ वर्षे ननंद, रघुनाथ कानोटे वय ४५ वर्ष नंदवही राहणार प्रधान सांगवी तालुका किनवट, सुनिता बालाजी पवार ४० वर्ष, ननंद, बालाजी पवार ४३ वर्ष नंदवही राहणार पाथर्डी तालुका हदगाव, माधव तुकाराम दुगाने वय ३१ वर्षे भाया, निष्वेता माधव दुगाने वय २३ वर्षे जाऊ राहणार बोरी तालुका उमरखेड या सर्वांवर कलम ४९८ (अ) ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बी डी. भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अशोक सिंगनवाढ हे करत आहेत.