रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गवर वैतागून ग्रामस्थांनी गुरे -ढोरे बांधायला सुरुवात केली -NNL


हदगाव, शे चांदपाशा|
हदगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार गोजेगाव ते वारंगा या राष्ट्रीय महामार्गावर या परिसरातिल अर्धवट पुलावर गुरे -ढोरे बांधायला सुरुवात केली असुन, काहींजण रोडच्या अर्धवट रोडवर जनावारे बांधत आहे. या अर्धवट राष्ट्रीय महामार्गावर अपघात केव्हा होईल याची शास्वती नसल्याने हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. या रोडवर भेगा पडल्याने नेहमी आपघाताची शक्यता असते हा राष्ट्रीय महामार्ग हदगाव शहरातुन जात आहे.

गोजेगांव ते वारंगा या 30ते 35 किमी मध्ये अनेक पुलांची कामे व रोडची कामे राहीलेली आहे. आता पर्यत या मार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक वाहनाचे नुकसान होत असुन यामुळे नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे बाकीच्या तालुक्याच्या मार्गावर रोडचे काम जलद गतीने होऊन वाहतुकीस खुला करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नादेड जिल्ह्याचे माजी पालकमंञी याच्या मतदार संघात अत्यंत जलद गतीने काम झालेलं आहे. तेच काम हदगाव तालुक्यातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच काम का होत नाही असा संतप्त सवाल नागरिक करित आहे.


या मार्गावर अपघात झाल्यास वाहतुक शाखेच सहकार्य वेळेवर मिळत नाही विशेष म्हणजे हे राष्ट्रीय महामार्ग असल्याने सतत अवजड वाहनांची वर्दळ असते. या नंतर ही रोड दुरुस्तीचे काम गेल्या तीन वर्षापासुन संथगतीने होत आहे. संबंधित यंञणेकडुन योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्याने यामुळेच अपघाताच्या घटना घडत आहे. यामुळे अर्धवट कामावर आता गुरेढोरे गोठे बाधण्यास या परिसरातील नागरिकानी सुरुवात केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी