उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत २० ऑगस्ट शनिवारी राधा आणि श्रीकृष्ण वेषभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात अनोखी " ज्ञानांची अक्षर शैक्षणिकहंडी " फोडून उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेत विविध रंगांच्या आकर्षक फुग्यांनी सजलेल्या दहीहंडी सोहळ्यात रंगवलेल्या हंडीत कृष्णाचे लोकप्रिय आवडते दही न ठेवता २१ व्या वर्षातील भारतीय स्वातंत्र्याचा आजादी का अमृतमहोत्सवी वर्षातील लहान लहान प्रश्नांच्या चिट्ठ्यांसह खाऊ मटक्या मध्ये ठेवण्यात आला होता. ज्याला जी चिट्ठी मिळाली त्याचे उत्तर त्याने द्यावयाचे अशा स्वरूपाची ज्ञानांची दहीहंडीचा खेळ खेळला गेला.
लेझीम खेळत सजून आलेल्या राधा आणि श्रीकृष्ण यांची मिरवणूक दहीहंडी पर्यंत काढण्यात आली. केंद्राचे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक जयवंतराव काळे व सौ.विद्या वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या उद्याची संकल्पना या उपक्रमातून संकल्पनेतून ज्ञानांची शैक्षणिकहंडी उत्सव साजरा करण्यात आला होता. शैक्षणिक हडी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यासाठी एकनाथ केंद्रे,शेख,सौ.पुठ्ठेवाड, यांच्यासह शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी या दहीहंडी सोहळ्यात आनंद लुटला. हा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात शैक्षणिकहंडी उत्सव पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.