पारडी ची जि.प.शाळा म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन व आदर्श ज्ञान केंद्र - भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार -NNL


लोहा|
लोहा तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन व आदर्श ज्ञान केंद्र असल्याचे प्रतिपादन मन्याड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा पिंपरी-चिंचवड चे सत्तारूढ गटनेते एकनाथ दादा पवार यांनी केले. यावेळी पारडी येथील एकनाथ दादा पवार यांच्या सदिच्छा भेटी प्रसंगी मन्याड फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष बालाजी परदेशी,ब्रम्हानंद सिरसाठ, भिमराव शिंदे, गजानन मोरे, बालाजी ढगे,किशन ढगे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल डिकळे, मुख्याध्यापक एम.एन.किसवे,व शाळेच्या वतीने एकनाथ दादा पवार यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.                   

एकनाथ दादा पवार यांनी शाळा परिसर,शाळेतील ज्ञानात्मक रंग रंगोटी, डिजिटल वर्ग, वर्गातील चाणाक्ष,बोलके विद्यार्थ्यांची तल्लख बुद्धीमत्ता पाहून शाळेचे मुख्याध्यापक एम.एन.किसवे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.यावेळी संवाद साधतांना एकनाथ दादा पवार म्हणाले, कि पारडी गावाचा,ज्ञान मंदीराचा व शालेय समीतीचा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेने घेऊन सर्वगुणसंपन्न, अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यावर भर द्यावा.आजचे विद्यार्थ्यी हेच उद्याचा भारत घडवू शकतात असेही ते म्हणाले.शाळेला पुर्ण वेळ देणारे मुख्याध्यापक,स्टाफ,समीती,शाळेसह गावाचे सहकार्य आवश्यक असते.

गेली वीस ते पंचवीस वर्षात पारडी गावाचे नाव जगाच्या नकाशावर कोरलेलं असल्याचे पाहून,ऐकून मला आनंद झाल्याचे व शाळेतील निसर्गरम्य वातावरण,बागडणारी ज्ञानवंत गुणवंत मुलं, किलबिलणारी पक्षांचा आवाज ऐकून व गावातील निःपक्षपाती पणाचे राजकारण व सुज्ञ जनता जनार्दन पाहून आनंद व्यक्त करत पारडी सारख्या किमान पंचवीस शाळा तालुक्यात स्वखर्चाने निर्माण करण्याचा त्यांनी माणस केला.तसेच माजी सरपंच दिगांबर डिकळे व ग्रामस्थांनी कायमस्वरूपी स्मशानभूमी व शाळेला क्रिडांगणा सदर्भात प्रश्न उपस्थित केला.स्थानिकला योग्य ती पुर्तता करा वरच्या स्तरावर अडचणी येत असतील तर नक्कीच निराकरण करण्याचे आश्वासनही दिले.

यावेळी माजी सरपंच दिगांबर डिकळे,माजी सरपंच बळीराम पवार,माजी उपसरपंच अरुण पवार, ग्रा.सदस्य प्र.व्यंकट डिकळे, संगणक परिचालक संग्राम डिकळे सह पालक वर्ग, असंख्य ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.तसेच पारडी येथील बंडू पवार यांच्या आणि तसेच माधव पवार यांच्या घराच्या वास्तू शांती निमित्ताने मन्याड फाउंडेशन चे पदाधिकारी यांनी भेट घेऊन स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी