हदगाव, शे चांदपाशा| मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या करिता हदगाव तालुक्यातील हडसणी या गावाचे दत्ता पाटील हे मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून दि 18 आगष्ट गुरुवार रोजी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हे बंदचे अहवान सर्व सकल मराठा समाज बांधव हदगाव तर्फ करण्यात आलेले होते.
प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या 9(नऊ) दिवसापासून दत्ता पाटील (हडसणीकर) हा युवक उपोषणास बसलेला आहे त्यांच्या उपोषणाची दखल दुर्दैवाने प्रशासनाच्या वतीने घेतली जात नाही. या पुर्वीही मराठा समाजा तर्फ महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने 51 मोर्चे काढण्यात आले व आरक्षणाकरिता बलिदान देवून सुद्धा शासनाला जाग आलेली नाही अस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दखल का नाही ...आत्मराम पाटील - मराठा समाजाला आरक्षण व विविध मागण्या करिता मुंबई येथे आमच्या हदगाव तालुक्यातील युवक दत्ता पाटील (हडसणीकर) हे गेल्या 9 (नऊ)दिवसापासुन आमरण उपोषण उपोषणाला बसलेले आहेत. त्याची साधी दखल ही पावसळी अधिवेशनात कोणत्याही लोकप्रतिनिधीने घेवु नये किमान या पावसाळी अधिवेशनात तरी हा मुद्दा दोन्ही सभागृहात उपस्थित करावा व मराठा समाजाला न्याय दियावा अशी मागणी युवा शेतकरी आत्माराम पाटील [वाटेगावकर] यानी केली आहे.