आम आदमी पार्टीच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी दिलीपराव शिंदे -NNL

आगामी काळातील सर्व निवडणूक आप सर्व ताकदीनिशी लढणार 


हिमायतनगर|
आम आदमी पार्टीच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी दैनिक लोकपत्रचे तालुका प्रमुख दिलीपराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे अधिकार पत्र पी.स. चाटेवार, प्रा.श्याम जाधव यांनी दिले. 


आज तीन तालुक्याचे सर्वेसर्व असलेले जेष्ठ कार्यकर्ते हे हिमायतनगर शहरात आल्यानंतर आम आदमी पार्टीची तालुक्यात स्थपणा करण्यात आली आहे. यावेळी आम आदमी या राष्ट्रीय पक्षाच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी दैनिक लोकपत्रचे तालुका प्रतिनिधी दिलीपराव शिंदे यांची निवड करण्यात आली. दिलीप शिंदे यांचा यापूर्वी भारिप ते कॉग्रेसचे तालुका सचिव असा राजकीय प्रवास राहीलला आहे. त्यानंतर त्यानी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनदोलन न्यास या संघटनेत तालुका अध्यक्ष पदाची धुरा १५ वर्षी सांभाळून तालुकातील अनेक भ्रष्टाचार बाहेर काडून भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे काम केले आहे.


त्यांच्या या कार्याची दाखल घेत तालुक्याच्या अध्यक्षपदाची धुरा दिलीपराव शिंदे यांच्यावर पी. स. चाटेवार, प्रा.श्याम जाधव यांनी सोपविली असून, आगामी काळात हिमायतनगर तालुक्यात होणाऱ्या निवडणुकीत जनतेला आता नवा राष्ट्रीय पक्ष पर्यायी म्हणून आम आदमी पार्टी तालुक्यात दाखल झाली  असून येणाऱ्या काळात तालुक्यातील ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत, निवडणुकीत उतरणार हे मात्र निश्चित म्हणावे लागेल.

यावेळी बोलताना नवनिवाचित अध्यक्ष दिलीपराव शिंदे म्हणाले कि, गाव तेथे आम आदमी पार्टी शाखा निर्माण करणार असून, संघटन वाढून तालुक्यात पक्ष मजबूत करण्यावर अधिक भर राहणार आहे. आपण सर्व पत्रकारांनी देखील याकामी सहकार्य कार्वे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पत्रकार तथा नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, वज्रसूची न्यूजचे शुद्धोधन हनवते, दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी सोपान बोपीलवर यांची उपस्थिती होते.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी