अतिवृष्टी नुकसानीच्या फेर तपासणीत ५१ टक्के नुकसानीचा अहवाल - आ.डॉ.तुषार राठोड -NNL

शेतक-यांच्या अतिवृष्टी नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई  देण्याची मागणी

मुखेड, रणजित जामखेडकर| तालुक्यात मागील दीड दोन महिन्यात सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही स्थानिक महसुल प्रशासनाने निष्काळजीपणाने केलेल्या पाहणीत केवळ ६४५ हेक्टर नुकसान झाल्याचा अहवाल पाठवला होता. त्यानंतर धर्माबाद व इतर ठिकाणच्या महसुली अधिका - यांनी मुखेड तालुक्याचा फेर तपासणीत तालुक्यातील ५१ टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला असून तो अहवाल जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठवण्यात आला आहे. 

त्याचबरोबर या अहवालाच्या संदर्भात कृषीमंत्री अब्दुल सत्तार नांदेडच्या दौ - यावर आल्यावर तालुक्यातील शेतक - यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी , अशी मागणी करणार असल्याची माहिती आमदार डॉ . तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली . यंदा मुखेड तालुक्यात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले . जिल्हा स्तरावरून जाहीर केलेल्या नुकसानीमध्ये तालुक्यातील केवळ ६४५ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे दिसल्यानंतर शेतक - यांनी संताप व्यक्त केला होता . 

यानंतर आमदार डॉ . राठोड यांनी जिल्हाधिका - यांनी यात लक्ष घालून इतर तालुक्यातील महसुली अधिका यांमार्फत पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती . त्यानुसार इतर ठिकाणच्या महसुली अधिका - यांनी केलेल्या फेर चौकशीत तालुक्यातील ५१ टक्के क्षेत्र बाधित आले . त्याचबरोबर मतदारसंघातील पेठवडज व कुरूळा या क्षेत्रातील पिकांची नव्याने पाहणी करून तो अहवाल शासनास पाठविण्यात आल्याचे आमदार डॉ . राठोड यांनी सांगितले . दरम्यान , केंद्राने व राज्य शासनाने जाहीर केलेल्या सरसकट नुकसान भरपाईमध्ये मुखेड मतदार संघाचा समावेश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी , अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्यंकट लोहबंदे , लक्ष्मण पाटील खैरकेकर , मनोज गॉड , आकाश पाटील बेळीकर , बालाजी शिंदे , शिवलिंग पाटील चांडोळकर , राजू घोडके , हनमंत पाटील नरोटे आदींची उपस्थिती होती .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी