मुखेड - कंधार मतदार संघातील रस्त्यासाठी ५६ कोटींचा निधी - आ. डॉ तुषार राठोड -NNL

मुखेड, रणजित जामखेडकर| मुंबईत १७ ऑगस्टपासून विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून यात अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यांसाठी मंजुरी देण्यात आली आहे . अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात मुखेड - कंधार विधानसभा मतदार संघातील काही गावांच्या अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी सुमारे ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला . लवकरच ही कामे सुरू करण्यात येतील , अशी माहिती आ . डॉ . तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मुखेड - कंधार मतदार संघातील रस्ते दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती . त्यात तालुक्यातील महत्त्वाच्या बाहाळी - बिल्लाळी , जाहुर , खानापूर या रस्त्याच्या बांधणीसाठी विशेष योजनेतून मोठ्या निधीची मागणी करण्यात आली आहे . हा रस्ता अशियाई बँक अर्थ सहाय्य योजेनेतून पूर्ण करावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे . हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे . हा रस्ता विशेष योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी आणून पुर्ण करण्यात येणार आहे . सद्यस्थितीत या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून दळणवळणासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे . 

ही बाब लक्षात घेवून कृष्णावाडी ते बापशेटवाडी या रस्त्यासाठी ७ कोटी रुपये तर पुढे जाहूरपर्यंतच्या रस्त्यासाठी १८ कोटी रुपये असे एकूण २५ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत . तसेच उंद्री ( पदे ) ते सोसायटी तांडा रस्ता प्रजिमा मधून मंजूर करण्यात आला असून सोसायटी तांडा अंतर्गत रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . कंधार तालुक्यातील कुरुळा सर्कल मधील अहमदपूर , मोहिजा , कुरुळा , नागलगाव , घोडज रस्ता नादुरुस्त झाला आहे . कुरुळा ते नागलगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत . कुरुळा भागातील नागरिकांची अहमदपूर येथे जाण्यासाठी गैरसोय होत आहे . त्यामुळे हा रस्ता रुंद व्हावा म्हणून मोहिजा , परांड्यापर्यंतच्या रस्त्यासाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत . 

कुरुळा - उमरगा खु . , दिग्रस बू , गुंटूर हा कुरुळा सर्कल मधील महत्त्वाचा रस्ता असून यासाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत . असा एकूण २६ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे . या रस्त्यांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत , असे आ . डॉ . तुषार राठोड यांनी सांगितले . यावेळी व्यंकटराव लोहबंदे , किशोर चव्हाण , बालाजी शिंदे बिल्लाळीकर , लक्ष्मण पाटील खैरकेकर , सुधीर चव्हाण , गणेश पाटील , जाधव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते . राज्यात सत्तांतर झाले असून केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे . येत्या अडीच वर्षाच्या काळात मतदार संघात भरपूर विकास निधी आणून मोठ्या प्रमाणात विकास कामे करणार असल्याचे आ . राठोड यांनी सांगितले . खऱ्या अर्थाने आता कामाला गती मिळणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केली .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी