भोकर| रोजी शासनाच्या विविध लेखभिमुख योजना विकसित व्हाव्यात आणि सर्व सामान्य जनतेला यांचा लाभ घेता यावा म्हणून भारतीय डाक विभागाने मिशन बेटी बचाव बेटी पढावं अंतर्गत "सुकन्या समृद्धी खाते योजना' प्रारंभ केली आहे. केंद्र व राज्यात या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
या बाबीचा विचार करून उपक्रमाला हातभार लावण्यासाठी भोकरचे उप नगराध्यक्ष श्री. शेख युसूफ भाई यांनी स्वातंत्र्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्ताने भोकर मधील वार्ड क्रमांक मध्ये चिखलवाडी, महंमद नगर,खाजा नगर या भागातील नागरिकांच्या कुटूंबियाच्या मुलींच्या नावे मोफत पहिला हप्ता देऊन सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचा विधायक संकल्प केला आहे. सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचे या भागातील ० ते १० वर्षा पर्येंतच्या लहान मुलीच्या आई व वडिलांना माहिती देऊन यादी माजी डाक मार्केटिंग अधिकारी सुरेश सिंगेवार हे करीत आहेत.
मुलीच्या विवाहात "कन्या दान ' करणे हा मानाचा समजला जातो* याच उद्देशाने सुकन्या समृद्धी खाते योजनेत मोफत दोनशे खाते उघडून " दान ' करण्याचा कार्यक्रम शेख युसूफ भाई कुटूंबियांनी घेतला आहे. भोकर येथील वार्ड क्रमांक मधील सर्व मुलींच्या आई व वडिलांनी मोफत सुकन्या समृद्धी खाते उघडून घ्यावे, असे आवाहन आयोजन: झरीन बेगम शेख युसूफ, सौजन्य: शेख युसूफ भाई उप नगराध्यक्ष भोकर, आधिक माहितीसाठी: संपर्क:सुरेश सिंगेवार माजी डाक मार्केटिंग अधिकारी पोस्ट ऑफिस भोकर 431801 मोबाईल क्रमांक 9405707010