हिमायतनगर| अतिवृष्टी नंतर सलग दहा ते पंधरा दिवस असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागी उगवलेल्या गवत खाल्यामुळे अनेक गाभण म्हशी व जनावरांमध्ये लालसर रक्तासारखी लघवी / कॉफी कलर लघवीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जनावरे दगावण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेण्यासाठी त्यांना हिरवा चार खाऊ न घालता वाळलेला चार द्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी बी.यु.सोनटक्के यांनी केले.
यामुळे जनावरांमध्ये आजाराची लक्षणे पोट फुगी, कॉफी कलर किंवा रक्ता सारखी लगवी, चारा न खाणे, अशक्तपणा, डोळे पिवळे पडणे, पशुची काळजी घ्यावी यासाठी पुढील निर्देश पाळण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे.
1. वाळेला कडबा पशुधनास घ्यावा.
2. खुरपलेले /निदलेले गवत एकाच पशुला जास्त देऊ नये.
3. पशुना रोज मिनरल मिक्सर द्यावे. तसेच खुरपलेले / निंदलेले गवत पशुधनास खाण्यासाठी दिल्यामुळे जनावरांचे पोट फुगीचे आजार वाढल्या बाबतची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ उमेश सोनटक्के यांनी यांनी दिली असून, सर्व शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घेण्याबाबत कळवले आहे.
जर कोणत्याही शेतकऱ्याच्या जनावरास लालसर लघवी / कॉफी कलर लघवी जनावरांमध्ये दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट द्यावी. योग्य औषध उपचार करून पशुधन दगावण्यापासून वाचण्यासाठी संपर्क करावा असे त्यांनी म्हंटले आहे.