ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा राज्य अभ्यासवर्ग उत्साहात
नांदेड| ग्राहक पंचायतीचे काम ही साधना आहे. माझ्या हातून जे कार्य होईल ते भगवंताचे पूजन होईल. सन 2044 मध्ये भारत विश्ववंदिता होईल असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले.ते नाशिक येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय अभ्यास वर्गाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
नाशिक येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात दि.20व 21ऑगस्ट राज्य अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गाला 25जिल्ह्यातून 350कार्यकर्ते उपस्थित होते. अभ्यासवर्गाच्या पहिल्या दिवशी नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नर्सिंगकर यांच्या हस्ते अभ्यास वर्गाचे उद्घाटन झाले.या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांसाठी काम करणाऱ्या ग्राहक पंचायतीस सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी कार्यकर्ता कसा असावा, राज्य सहसंघटक -ग्राहक पंचायत महाराष्ट्रची रचना व कार्यपद्धती, विदर्भ प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय विज ग्राहक जागृती-समस्या व निवारण, दत्ता शेळके व सुधीर काटकर - इ दाखले यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम दरम्यान सामाजिक चातुर्मास ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.तर रात्रीच्या सत्रात गजेंद्र क्षीरसागर यांनी ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांची घेतलेली मुलाखत दाखविली.यानंतर शरद वडगावकर यांनी देशभक्ती पर गीते सादर केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा कुलकर्णी यांचे चिंतन,प्रवासी महासंघ प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगौड़-प्रवासी महासंघ एक संकल्पना,गणेश परळीकर सहआयुक्त अन्न औषध प्रशासन,मुंबई ग्राहक आयोग सदस्य श्रद्धा बहिरट यांनी नवीन सुधारित ग्राहक संरक्षण कायदा 2019, सुधीर साळवे, वैध मापन शास्त्र, हेमंत वडणे माहितीचा अधिकारी, कोकण विभाग अध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील-सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम दरम्यान साधनाताई यांच्या हस्ते ज्ञानेश्वर महाजन (उद्योजक ), उदयन दीक्षित (व्यापारी),चंद्रकांत वाघ (शेतकरी), सुनीता पाटील (श्रमिक) मन्दोदरा कापडणीस (ग्राहक), अलमशाह मोमिन (उत्कृष्ट कार्यकर्त्ता) यांना पंचप्राण तर ज्येष्ठ साधक लक्ष्मण गव्हाणे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.नाशिक विभाग अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, कोकण विभाग अध्यक्ष प्रा. एस. एन पाटील यांचा सत्कार राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी केला.
डॉ. विजय लाड समारोप प्रसंगी पुढे म्हणाले, विश्व वंदिता भारत होण्यासाठी, महाराष्ट्रात 75 ग्राहक मार्गदर्शन केंद्र ,शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ग्राहक जागृत केली जाईल. सूत्र संचालन डॉ. महेश मुदगल, मनीषा सोलुंखे तर आभार प्रदर्शन सुरेशचंद्र धारणकर यांनी केले.राज्य सह संघटक मेघा कुलकर्णी यांच्या पसायदानाने समारोप करण्यात आला.