नांदेड| मानवी आयुष्य सुखी आणि समृद्ध बनविण्यासाठी पद, पैसा, प्रतिष्ठा असून भागत नाही. व्यक्तिमत्वाचा विकासात मनाचा विकास आवश्यक आहे. पंचशील, अष्टशिलाचे पालन करुन दहा पारमितांचे अनुसरण करावे तसेच कुशल कर्म करुन पुण्य अर्जित करावे असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, धम्मसंदेश धम्मदान यात्रेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, सिद्धांत इंगोले यांची उपस्थिती होती. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू संघासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. दान पारमिता महोत्सवात अनेक बौद्ध उपासक उपासिकांनी सहभाग नोंदवत आर्थिक दान केले. विविध उपक्रमांनी पंय्याबोधी थेरो यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
शहीद भगतसिंह युथ बिग्रेड महाराष्ट्र राज्याच्या वतीने मार्गदर्शक गुरुवर्य भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्णा शहरात रॅली काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा या महापुरुषांच्या विचारांना व त्यागाला स्मरून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित बौद्ध उपासक उपासक उपासिकांना मिठाईंचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथे रुग्णांना फळांचे वाटप वृक्षारोपण करण्यात आले. मोठ्या थाटामाटात ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी शहरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुंदन ठाकूर, सुकेशनी गोधने, चंद्रमुनी लोखंडे, प्रबुद्ध काळे, प्रक्षित सवणेकर, भीमराव आवटे, प्रतीक मगरे, सुमित गायकवाड, सुधाकर मासे, सचिन ढगे, अमोल पळसकर, शेख मुशरफ, शेख सिकंदर, हर्षद कापुरे, शादुल मधीकर, राजकुमार वावळे, विजय ठाकूर, केतन काळे, आसिफ पठाण, अंकुश वावळे, इत्यादींनी परिश्रम घेतले.