लोहा| स्पर्धा प्रचंड आहे त्यात यश मिळवायचे असेल तर एकाग्रता असायला पाहिजे.आपण ग्रामीण भागातील आहोत असा न्यूनगंड न बाळगता जिद्द व मेहनत करा सकारात्मक दृष्टी ठेवा यश हमखास मिळेल असे मार्गदर्शन लोहा नगर पालिकेचे मुख्याधिकारी ऍड गंगाधर पेंटे यांनी केले.
जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लोहा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी ऍड पेंटे बोलत होते. यावेळी नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशीनाथ शिरसिकर, संचालक हरिहर धुतमल, सुदन वटटमवार , संचालक प्रवीण धुतमल,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष राम पाटील पवार, पत्रकार रत्नाकर महाबळे, शिवाजी पांचाळ, इमाम लदाफ, श्याम नळगे, व्यवस्थापक बालाजी धनसडे यांची उपस्थिती होते.
मुख्याधिकारी ऍड पेंटे यांनी अभ्यास कसा करावा कोणते पुस्तक रेफर करावे याचे मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रता व जिद्द ठेवा तसेच सकारत्मक दृष्टी यश मिळवून देते असे मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता त्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी अथक परिश्रम तर घ्यावेच शिवाय नवनवीन परीक्षा बदलाची माहिती करून घ्यावी कोणत्या विषयाला किती गुणांचा भारांश आहे. हे पाहून त्या त्या विषयाचा अभ्यास करावा असे सविस्तर मार्गदर्शन मुख्याधिकारी ऍड पेंटे यांनी केले .अभ्यासिकेचे संकल्पक हरिहर धुतमल यांनी प्रास्ताविक केले आभार रत्नाकर महाबळे यांनी केले.