हिमायतनगर| रात्रीपासून सुरु झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातिल मौजे वडगाव ज येथील जिल्हा परिषद शाळेत पाणीच पाणी झाले असून, अगोदर येथील तलाव भरलेला असताना आज झालेल्या मुसळधार पावसाने गावात पाणी शिरण्याची शकयता वर्तविली जात आहे.
मागील काळात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील मौजे वडगाव ज येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने सह दिवस येथील गावकऱ्यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे दळणवळनाचा प्रश्न निर्माण झाला, आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गाने हिमायतनगर गाठावे लागले होते. त्यानंतर पाऊस उघडला मात्र येथील सुना तलाव १० टक्के भरून सांडव्यातून पाणी वाहत असल्याने पाण्याचं ओघ सुरूच होता. दरम्यान आज सकाळी ७ वाजल्यापासून पुन्हा हिमायतनगर तालुक्यावर आभाळ फाटले आणि या झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने गावकऱ्यांचा संपर्क हिमायतनगरशी तुटला आहे.
एव्हडेच नाहीतर पुराचे पाणी येथील जिल्हा परिषद शालेय येऊन पोचले असून, पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे तलावाच्या पुराचे पाणी वाडगावमध्ये शिरण्याची भीती गावकर्यांनी व्यक्त केली आहे. या गावाची पुराच्या पाण्याने होणारी अवस्था लक्षात घेता प्रश्नाने येहे लक्ष केंद्रित करून तलावाची उंची वाढवावी आणि येथील पुलाची उंची वाढूं वारंवार बंद होणार गावचा संपर्काच्या समस्यांपासून सुटका द्यावी अशी मागणी केली जात आहे. याकडे सर्वच राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो असल्याचे गावकरी सांगत आहेत. आत्तातरी या गावची समस्या कायमची मिटविण्यासाठी शासन लक्ष देईल का याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
येथील सुना तलावावर गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना ज, पिछोण्डी, वडगाव बसस्टोप, वडगाव ज, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा १, २ व ३, वाळकी, वाळकी तांडा, या गावांची भिस्त आहे. याचा पाण्यावर या गावची तहान आणि सीनचा प्रश्न सुटतो. मात्र तलावात तलावात झाडे झुडपे गाळ वाढला असून, उंची कमी असल्याने पावसाळ्यात झालेले पाणी गावानजीक येते आणि वाया जाते. तसेच ओव्हरफलो झाल्याने सुना तलावाचे पाणी बाहेर पडून गावं परिसराला पुराच्या पाण्यामुळे वेढा बसला आहे. मागील काळात या पुलाच्या पुरात वाहून दोघा जणांचा बळी गेला आहे, तर गतवर्षी आलेल्या पुरात एक ऑटो वाहून गेला होता, सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले आहेत. अश्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून येथील पुलाची उंची वाढऊन तलावाच्या आतील गाळ काढून उंची वाढवावी अशी मागणी केली जात आहे.