मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु) येथे दि .२७ रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान भूगर्भात एक अचानक आवाज होऊन जमिन व गावातील घरानां कंपनरुपी सौम्य धक्का जाणवला. सुदैवाने यात कोणतेही नुकसान अथवा जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
साधारण २९ वर्षापूर्वी १९९३ साली आंबुलगा (बु) परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. कंपनरुपी आवाजाची तीव्रता कमी असली तरी त्याचे कंपन जास्त होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .या संदर्भात अंबुलगा ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन कळविण्यात आले आहे . यावेळी अंबुलगा सज्जाचे तलाठी जगन्नाथ वारकरे , सरपंच (प्र) बालाजी रॅपनवाड यांची उपस्थिती होती.