आता रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची गरज-डी.पी.सावंत -NNL

केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन


नांदेड|
जुलमी ब्रिटीश राजवट उलथवून टाकण्यासाठी 137 वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. काँग्रेसच्या माध्यमातून भारतीय जनतेनी ब्रिटीश सरकारला देशातून पिटाळून लावले. आता पुन्हा एकदा देशामध्ये हुकुमशाही प्रवृत्तीने उच्छाद मांडला असून ईडी, सीबीआय, आयटीच्या माध्यमातून विरोधकांना घाबरविण्याचे प्रकार वाढले आहेत. अशावेळी केवळ धरणे आंदोलन करुन न थांबता आता रस्त्यावर येवून संघर्ष करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी आज येथे केले.

येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रीमती सोनिया गांधी यांच्या विरोधात ईडीने कारवाई केल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशाला फार मोठा संघर्षाचा इतिहास आहे. जगातील कुठलीच जुलमी राजवट फारकाळ राज्य करु शकली नाही. याचे भान केंद्रातील भाजप सरकारला राहिले नाही. ईडी व सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांवर खोटे आरोप करुन त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयोग सुरु आहे. हेरॉल्ड प्रकरणात श्रीमती सोनिया गांधी असतील किंवा राहूल गांधी असतील यांचा कुठलाही दोष नसताना केवळ चौकशीच्या नावाखाली पाच ते सहा तास ईडीच्या कार्यालयात बसवून ठेवून त्यांची बदनामी करण्याचा डाव केंद्र सरकारचा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्यावतीने तब्बल तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आ.मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेंद्र घोडजकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य एकनाथ मोरे,महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ.रेखाताई पाटील, सुमती व्याहाळकर,  तालुकाध्यक्ष ॲड.निलेश पावडे,मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शमीम अब्दुल्ला, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविताताई कळसकर, नगरसेवक सुभाष रायबोले, ब्लॉक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हटकर, एनएसयुआय शहराध्यक्ष शशीकांत क्षीरसागर आदींनी त्यांच्या भाषणातून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या धरणे आंदोलनात सूत्रसंचालन संतोष देवराय यांनी केले. तर उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार सिडको ब्लॉकचे कार्याध्यक्ष राजू लांडगे यांनी मानले.

आजच्या या धरणे आंदोलनात महापौर जयश्रीताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी.आर.कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, सौ.मंगाराणी अंबुलगेकर, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा नेरलकर, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, ओबीसी सेलचे महानगराध्यक्ष विजय देवडे, स्थायी समितीचे माजी सभापती अमितसिंह तेहरा, मसूद खान, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महिला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मंगलाताई निमकर, विलास धबाले, मुन्ना अब्बास, संतोष मानधने, उमेश पवळे, किशोर भवरे, संजय मोरे, दयानंद वाघमारे, शेर अली, संजय पांपटवार, संदिप सोनकांबळे, फेरोजखान, करणसिंग खालसा, भालचंद्र पवळे, दिपक पाटील, सुभाष पाटील, श्‍याम कोकाटे, किशन कल्याणकर, संतोष मुळे, सुखदेव जाधव, रहीम खान, अस्लम शेख, शंकर धिरडीकर, डॉ.नरेश रायेवार, डॉ.करुणाताई जमदाडे, मोहम्मद हबीब, उत्तम पाटील वडवळे, किशनराव लोंढे, भास्करराव जोमेगावकर,रमेश गोडबोले, सखाराम तुप्पेकर, मारोती पाटील शंखतीर्थकर, उध्दवराव पवार, माणिक देशमुख, मंगला धुळेकर, अतुल पेद्देवार, विक्की राऊतखेडकर, नितीन पाटील झरीकर, राहूल देशमुख, संजय संत्रे, वसंत जाधव, उमेश गिरी, साहेबराव सावंत, सत्यपाल सावंत, शिल्पा नरवाडे, पद्मा झंपलवाड, अरुणा पुरी, दिपकसिंह हुजुरिया, सय्यद नौशाद, संघरत्न कांबळे, संजय वाघमारे, अभिजित हळदेकर, रफीक पठाण, नागोराव खानसोळे, बबन वाघमारे, त्र्यंबक शिंदे ,आनंदा गायकवाड,कविता चव्हाण, संदिप कदम यांच्यासह उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी