राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमाकांत पा.जाहुरकर यांची तहसीलदारांमार्फत सरकारकडे मागणी
मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यात चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता आलेले उभं पीक निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे मुखेड तालुकात ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई. द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमाकांत पाटील जाहुरकर यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
तालुक्यात गेल्या २० जुलै पासून सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.सोयाबीन,मूग, उडिद, बाजरी, कापुस या पिकांचे अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पीके पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखाे रुपयांचे नुकसान हाेवून बळीराजा हवालदिल झाला आहे.
शासनाने नुकसानींचे प्रत्यक्ष बांधावर जावुन पंचनामे केले जात नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहे. ५० टक्क्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले असल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.या पावसात नागरिकांच्या राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमाकांत पा. जाहुरकर यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेतृत्व बालाजी पा.सांगवीकर,राम पा.जाहुरकर,निखील पा.पळसवाडीकर, अविनाश पा.इंगळे यांच्या सह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.