चोरीला आळा घालण्यासाठी कोळी येथे दररोज २० ग्रामसुरक्षा दल युवकांचा पहारा -NNL


हदगाव, शे.चांदपाशा|
तालुक्यात मौजे कोळी येथे चोरट्या मुळे भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. निवघा परिसरातील गावामध्ये तर जास्त चोऱ्या होत असल्यामुळे कोळी गावातील लोकांनी आपली काळजी आपण घेणार असे सांगत गावामध्ये दररोज २० युवकांचे ग्रामसुरक्षा दल तयार करून रात्रगस्त सुरु केली आहे.

मागील काळात हदगाव शहर घडलेल्या चोरीच्या घटनेनन्तर संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच ग्रामीण भागातील विविध गावात चोरीच्या घटना होत असल्याने आता चोरट्याना धडा धिकउन अद्दल घडविण्यासाठी आणि आपली सुरक्षा आपण करावी या उद्देशाने ग्रामसुरक्षा दल स्थापन केलं आहे. मागील एका महिन्यापासून उमरखेड हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये धाडसी चोरीचे सत्र चालू आहे. त्यासाठी गुरखी किंवा पोलिसांच्याच भरोशावर रात्रभर निश्चिंत झोपणे योग्य नाही. असे कोळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर यांनी सांगितले.

या मुळे गावातील लोकांनी जो निर्णय घेऊन आपल्या गावाची सुरक्षा आपण करणार अशी गावातील नागरिकांनी माहिती दिली. त्यांची हे कार्य अभिनंदनीय असून, पोलीस प्रशासन हे सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही त्यांमुळे गावातली गस्त गावकरी करत असल्याने पोलिसाना सहकार्य मिळत आहे. तालुकायत एकच गाव नसून पोलिसानं विविध गावाकडे रात्रगस्त करावी लागते. अनेक खेडे फिरावे लागते हे गावातील नागरिकांनी समजून घेऊन आपल्या गावाची सुरक्षा आपल्याला करावी लागणार असे सांगत गावामध्ये २० लोकाचा गट करून रात्रीला दररोज जागरण करत आहेत. असे कोळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व युवक काँग्रेस सर्कल प्रमुख गंगाधर पाटील कोळीकर यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी