हिमायतनगर येथून ५ कुटुंब अमरनाथ यात्रेला झाले रवाना -NNL


हिमायतनगर|
येथील ५ कुटुंब बाबा बर्फानी म्हणजे अमरनाथ येथील महादेव दर्शनाच्या यात्रेला निघाले आहेत. आज दुपारी ३ वाजेच्या नंदीग्राम एक्सप्रेसने रवाना झाले असून, येथील व्यापारी संदीप अग्रवाल, संजय पेन्शनवार व अनेकांनी पुष्पगुछ देऊन अमरनाथ यात्रेला शुभेच्छा दिल्या आहेत. 


सोमवार रोजी निघालेले यात्रेकरू सांयकाळी मुंबईला पोचतील ते मुंबईहुन विमानमार्गे श्रीनगर, सोनमर्ग, अमरनाथ, श्रीनगर, गुलमर्ग, गंडोला, दललेक, पहेलगाम, वैष्णवदेवी आणि जम्मू हून विमानाने श्रीनगर मार्गे हैद्राबाद येथून परत आपल्या गावी येतील. या यात्रेकरूंमध्ये प्रा राजेश कागणे, विकास पाटील देवसरकर, प्रा अनिल अंडगे, प्रा.नरवाडे सर, व्यंकटेश दमकोंडवार यांचा सहकुटुंब समावेश आहे. त्यांची यात्रा यशस्वीरीत्या संपन्न व्हावी रस्ताही शहरातील अनेक हितचिंतकांनी शुभेछा दिल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी