नांदेड| नांदेड जिल्हा पद्मशाली समाज युवक संघटना आयोजित जिल्हास्तरीय पद्मशाली समाज गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त अधिकारी, पदाधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी, कोरोना योध्दा सत्कार समारंभ कार्यक्रम कुसुम सभागृहात दि.२४ जुलै रोज रविवारी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पद्मशाली संघम हैद्राबादचे माजी अध्यक्ष श्रीधर सुंकरवार, सत्कार मूर्ती पद्मशाली समाजातील आय ए एस अधिकारी रामेश्वर सब्बनवाड, अखिल भारतीय पद्मशाली संघम हैद्राबादचे नवनिर्वाचित अध्यक्ष कंदगटला स्वामी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय पद्मशाली संघम हैद्राबादचे महिला अध्यक्षा दूषयन्तला वन्नम, उपाध्यक्ष प्रल्हादराव सुरकूटवार, चेरमन लक्ष्मीकांत गोणे, डॉ. मारोतराव क्यातमवर,सतिश राखेवार, व्यंकटेश जिंदम, सिताराम म्यानेवार,नारायन श्रीमनवार,तुलसीदास भुसेवार, सुभाष बलेवार, नागनाथ गड्डम,राजेश यन्नम,नागेश कोकुलवार, व्यंकट चिलवरवार, प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक नंदुसेठ अडकटलवार मंजुवाले, शिवप्रकाश चन्ना मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प.नांदेड ,प्रा. धनंजय देवमाने, संतोष कंदेवार सहाय्यक संचालक स्थानिक लेखा,
मराठवाडा पद्मशाली महिला संघटना अध्यक्षा कविता गड्डम,ललिता निलपत्रेवार, कलावती चातरवार,एस एम रसच्चावाड,सपोनि संजय निलपत्रेवार,उमेश कोकुलवार, धनंजय गुमलवार,शिवंशकर सिरमेवार,शिवाजी अनमवार, व्यंकटेश पुलकंठवार हे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संग्राम निलपत्रेवार, बजरंग नागलवार, नंदकुमार गाजुलवार,व्यंकटेश अमृतवार, भारत राखेवार, सत्यजीत टिप्रेसवार, श्रीनिवास गुरम,दयासागर शिवरात्री, नवीन पेंटा, सचिन रामदिनवार,प्रवीण राखेवार, मधुकर पुरणेकर,कृष्णा चलींदरवार, अनिल गड्डपवार,प्रल्हाद गुजरवार, संदिप यलगंदवार,अक्षय सुरकूटवार,मोहन जोगेवार, बलराज बाबळीकर, भारत गठेवार, दत्तप्रसाद सुरकूटवार, संजय टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, शिवशंकर सिरमेवार,बालाजी निलपत्रेवार,
संतोष गुम्मलवार,नासा येवतीकर, शिवाजी अन्नमवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी इयत्ता दहावी व बारावी पंच्याहत्तर टक्केच्या वर असलेल्या अडीशे विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र,सन्मान चिन्ह व फाईल देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सभागृह भरले होते आणि संबंध जिल्हाभरातून समाज बांधव भगिनी व विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम निलपत्रेवार यांनी केले. प्रल्हाद सुरकूटवार व डॉ मारोतराव क्यातमवार यांनी सामाजिक भूमिका सांगितली. रामेश्वर सब्बनवाड व प्रा.देवमाने यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शंकरराव कुंटुरकर सर व नंदकुमार गाजुलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संग्राम निलपत्रेवार यांनी मानले.