अनेक पक्ष कास्टव्हॅलीडीटी असलेल्या उमेदवारांच्या शोधात
अर्धापूर, निळकंठ मदने। तालुक्यातील ३ जिल्हा परिषद गटाचे व ६ पंचायत समिती गणाचे आरक्षण गुरुवारी जाहीर होताच,ईच्छुक मतदाराजा समोर प्रकट झाले,येळेगाव गटात सर्वसाधारण प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेची जागा सुटल्याने येथे ईच्छुकांची भाऊगर्दी होणार असून, लहान व मालेगाव गटात अनपेक्षितपणे आरक्षण राखीव झाल्याने सहा महिन्यांपासून तयारी करणाऱ्या मातब्बरांना जबर धक्का बसला आहे,शेवटी लहान व येळेगाव पंचायत समितीवरच सभापती होण्यासाठी बड्या नेत्यांचा डोळा आहे, एकंदरीत भर पावसाळ्यात राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असल्याने गावागावांतील मुख्य चौकात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
अर्धापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे लहान,येळेगाव, मालेगाव हे ३ गट आहेत,तर मालेगाव,येळेगाव, लहान,कामठा( बु), पिंपळगाव (म),पार्डी(म) हे ६ गण आहेत,हादगाव तालुक्यातील त्या ७ गावांचा नव्याने अर्धापूर तालुक्यात समावेश झाला,त्यामुळे १ जिल्हा परिषद गट व २ पंचायत समितीचे गणाची वाढ झाली आहे.लहान गटात सरचिटणीस संजय देशमुख लहानकर व मालेगाव गटात युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, यांनी तर ओबीसी व एस्सी प्रवर्गातून ही मातबरांनी जोरदार तयारी केली होती,पण लहान गट एस टी साठी आरक्षीत झाल्याने इच्छुकांचे स्वप्न भंगले आहे,येळेगाव जिल्हा परिषद गट भाऊराव चव्हाण कारखान्याच्या हद्दीत असल्याने व खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने येथे पक्षाची उमेदवारी आणण्यासाठी सर्वाधिक मेहनत ईच्छुकांना करावी लागणार आहे,या गटात सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,अशोकराव टेकाळे अमराबादकर,माजी सभापती आनंदराव कपाटे, उपसरपंच भगवान तिडके, संचालक अँड.सुभाषराव कल्याणकर,युवकचे माजी विधानसभा अध्यक्ष मदन देशमुख,युवकचे सरचिटणीस नवनाथ कपाटे, सरपंच प्र. ज्ञानेश्वर राजेगोरे,माजी सरपंच राजकुमार जाधव, दिगंबर तिडके हे काॅग्रेसकडून इच्छुक आहेत.
तर शिवसेनेकडून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, संचालक दता पाटील पांगरीकर,पं.स.उपसभापती अशोक पाटील कपाटे, तालुकाप्रमुख संतोष कपाटे,माजी पं स सदस्य बालाजीराव कल्याणकर, माजी तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर,संभाजी पाटील,व राष्ट्रवादी काँग्रेस कडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पप्पू पाटील टेकाळे,उध्दवराव राजेगोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आत्माराम कपाटे,शेतकरी संघटनेकडून जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, वंचीत बहुजन आघाडीकडून बंन्टीभाऊ मोरे हे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत.मालेगाव गटात काॅग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य भुजंगराव साखरे, पिंन्टू स्वामी,शंकर कंगारे,भाजपाकडून तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,जेष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ राजेवार,माजी सरपंच नागोराव बिचकुले,माजी उपसरपंच बालाजी मरकुंदे,हे इच्छुक असून चाचपणी करीत आहेत.
लहान जिल्हा परिषद गट एस टी साठी आरक्षीत झाल्याने काॅग्रेस कडून निमगावच्या सरपंच आर्चना संजय मोळके,पार्डीच्या सुमन हरी डवरे, शेणीच्या मनीषा सुरज पन्नासे,तर शिवसेनेकडून माजी पं स सभापती श्रीमती पद्मावती चंद्रकांत घोरपडे,तर इतर पक्षांना येथे जात वैधता प्रमाणपत्र धारक उमेदवार शोधावा लागणार आहे,सहा पंचायत समितीच्या जागासाठी ईच्छुकांची मोठी संख्या आहे,आरक्षण जाहीर झाल्यावर सर्व पक्षीय इच्छुक विविध कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यकर्त्यांना व मतदारांना आर्शीवाद मागत आहेत,तर अनेजण सर्व ईच्छुकांना "हम तुम्हारे साथ है " असे म्हणत ईच्छुकांचे मनोबल वाढवत आहेत, सप्टेंबर महिन्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भर पावसात राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे.