तुझा खर्च लागला वाढू... सांग किती मी कर्ज काढू...NNL


उस्माननगर, माणिक भिसे। शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय जीव गहाण ठेवून दोन दिवस पावसाच्या विश्रांतीनंतर गत तिन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळत असल्याने अक्षरशः डोंगरास जसे पाझर लागतात, तशा प्रकारची शेती जमिनीत पाझर फुटल्याने आता शेतात पिकाऐवजी पाणीच पाणी दिसून येते. अति पावसामुळे पिके उन्मळून जात असल्याने खरीप हंगामातील पिकांची प्रचंड हाणी झाल्याने खरीपातील लागवडीचा खर्च देखील निघणे देखील दुरापास्त होऊन बसला असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

करण्यात येणार आहे. असे असले तरी शेती ही केवळ आणि केवळ निसर्गाच्या भरोशावर अवलंबून असल्याने कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकन्यांच्या हातात मेहनत करण्याशिवाय दुसरे काही नाही. त्याने काबाडकष्ट करून पिकविलेल्या कापूस, सोयाबीन यासह अन्य शेती माल विक्री भाव ठरविण्याचा देखील त्याला अधिकार नाही, असा बेभरोशाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनाकडून अनेक योजना कृषी विभाग, पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग यांच्याकडे वर्ग केल्या, मात्र प्रशासनाच्या उदासिनता व काही दलाल अधिकारी यांच्या अजगरी महत्त्वाकांक्षीपणामुळे या योजना गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहचू शकल्या नसल्याने जाजही शेतकरी योजनांच्या प्रतिक्षेत आहेत. शेतीचा दिवसेंदिवस वाढता खर्च भागविता भागविता नाकीनऊ आले असल्याने 'तुझा खर्च लागला वाढू, सांग किती मी कर्ज काढू...' अशी म्हणण्याची वेळ ओढवली आहे.

ओलाव्यामुळे जमिनीतच

खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचे भाव दुपटीने वाढल्याने येथेच शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले. त्यातच बँकांची पीक कर्ज वाटपात दिरंगाई अशा अवस्थेत सावकारी कर्जबाजारी होऊन बि बियाणे व खताची जेमतेम खरेदी केली. त्यात बे भरोशाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने तालुक्यातील शेतकयांनी मृग नक्षत्राच्या पहिल्या आठवड्यात कापूस या पिकाची लागवड केली. त्या काळात तुरळक पाऊस पडून उघडून गेल्याने कपाशी बियाणे अतल्याआत कोमेजून गेल्याने 'इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यांची होवून बसल्याने शेतकरी हा हताश झाला होता. अशा परीस्थिती देखील त्याने दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जात दुबार पेरणी केली. पेरणी केल्याच्या सुरुवातीच्या काळात पाऊस समाधानकारक पडत असल्याने शेतकरी आनंदी होऊन दुबार पेरणीच्या संकटाचा विसर पडतो न पडतो की तालुक्यात ११ जुलैपासून निसर्ग प्रकोप होऊन सतत सात ते आठ दिवस मुसळधार पावसाने वैमान घातल्याने नदी नाल्या काठावरील शेत जमिनीतील पिके पुराच्या पाण्याच्या विळाख्यात नष्ट होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. राजकीय मंडळीनी शेतशिवाराची पाहाणी करीत शेतकऱ्यांना धीर दिला आहे. पण फुकट दिलेल्या थिराने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई होणार काय? शेतकरी अद्यापपर्यंत आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत असून शेतीचा दिवसेंदिवस वाढता खर्च भागविता भागविता नाकीनऊ आले असल्याने  " तुझा खर्च  लागला वाढू , सांग किती मी  कर्ज काढू  " अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे..


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी