बनावट चलनी नोटा टोळीतील फरार आरोपी तब्बल दीड वर्षांनंतर हिमायतनगर पोलीसाच्या जाळ्यात -NNL

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केलं हिमायतनगर पोलिसांचा अभिनंदन


हिमायतनगर, अनिल मादसवार|
११ जानेवारी २०२१ रोजी बनावट नोटा प्रकरणातील गुन्ह्यात फरार असलेल्या पारवा येथील चौथ्या आरोपीला हिमायतनगर पोलिसांनी तब्बल दीड वर्षानंतर अटक केली आहे. त्यामुळे बनावट नोटांच्या प्रकरण तपासाला गती मिळणार असून, यात आणखी कोण कोण सामील आहे याचा तपास पोलिसांनी करून रैकेटचा पर्दाफाश करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरीकातून केली जात आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील बनावट चलनी नोटा टोळीवर हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे दि.11/01/2021 रोजी गु.र.न 11/2021  कलम 420,489 (ब)(क),34 भादवा प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गन्हयातील आरोपी क्रं.1 शेख सत्तार शेख बाबु रा.आंबेडकर नगर वारड 2.शेख महेमुद शेख रसुल रा.शेखफरीद नगर भोकर 3.विकास संभाजी कदम रा.टाकराळा ता.हिमायतनगर यांना सदर गुन्हयात वेगवेगळया तारखेला अटक करुन त्याच्याकडुन तपासामध्ये 100 रुपयाच्या 05 नोटा, 200 रुपयाच्या 41 नोटा, आणि 500 रुपयाच्या 47 नोटा असा एकुण 93 वनावट नोटा गुन्हयात वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आल्या.


आरोपीचा एमसीआर करुन संदर गुन्हयामध्ये वरील तिन आरोपी व एक फरार आरोपी नामे गजानन बालाजी माने रा.पारवा (बु) ता.हिमायतनगर यांच्या विरोधात वि.कोर्टात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. तेव्हा पासुन फरार असलेला आरोपी गजानन बालाजी माने रा.पारवा (वु) ता.हिमायतनगर यांचा शोध चालु असताना आज फरार आरोपी हा हिमायतनगर येथे आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. 


हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सहा.पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोहेकॉ/सिंगनवाड, मपोहेकॉ/कांगणे,नापाका /नागरगोजे,पोकॉ/जिकंलवाड असे मिळालेल्या माहिती प्रमाणे फरार आरोपिला यास ताव्यात घेवुन पुढील  कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारो अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी