तब्बल चाळीस वर्षानंतर कार्यकारणी घोषणा
नवीन नांदेड| शिक्षण प्रसारक मंडळ सिडको नविन नांदेड चा अध्यक्षपदी शिवप्रसाद भराडे तर उपाध्यक्ष पदी तुकाराम देव यांच्यी निवड बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी डि.जी.कर्णे यांनी केली.
२४ जुलै २२ रोजी शिक्षण प्रसारक मंडळ नविन नांदेड ता.जि.नांदेड एफ ७९९(ना) या न्यासाच्या कार्यकारी मंडळ निवडणूक मध्ये निवडून आलेल्या सात कार्यकारी मंडळाच्या सभासदामधुन न्यासाच्या घटनेतील तरतूदी प्रमाणे न्यासाच्या कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी बाबतचे निवडणूक घेतली असता कार्यकारी मंडळाच्या एकुण सात पदाधिकारी पदासाठी प्रत्येक पदनिहाय एक असे सात अर्ज प्राप्त झाल्याने या सात उमेदवारासह त्या त्या पदावर बिनविरोध निवड झाल्याचे घोषणा करण्यात आली.
यात अध्यक्ष शिवप्रसाद मोतीलाल भराडे, उपाध्यक्ष तुकाराम गंगाराम देव, सचिव नारायण रामन्ना कदमंवार, सहसचिव रावसाहेब किशनराव कुलकर्णी, कोषाध्यक्ष अनंतराव माधवराव जोशी, सदस्य विनोद कुमार रामकिशन खरे,रत्नाकर दासराव जोशी यांच्या समावेश असल्याचे निवडणूक अधिकारी तथा शिक्षण प्रसारक मंडळ न्यु नांदेड तथा निरीक्षक १ ,सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नांदेड यांनी घोषित केले,या वेळी साहाय्यक निवडणूक अधिकारी के.पी.तुपेकर,एन.बी.साळवे यांनी सहकार्य केले.सदरील निवडीचे पत्र शाळेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहे.हि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अंभिनदन केले आहे.