नांदेड| लोहा तालुक्यातील टाकळगाव सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी शंकरराव पाटील मोरे तर व्हाइस प्रभाकर पंढरी थेटे यांच्यी बिनविरोध निवड दि.२४ जुलै २२रोजी ग्रामपंचायत कार्यालय टाकळगाव येथे घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली.
टाकळगाव ता.लोहा सोसायटीच्या संचालक मंडळ यांच्यी बिनविरोध निवड झाल्यानंतर चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी दिनांक २४ जुलै रोजी साहयक निबंधक बि.बी.बोधगिरे यांच्या आदेशानुसार निवडणूक अधिकारी एम.एस.सादलापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव कवडे व्हि.ए.यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली या वेळी चेअरमन पदासाठी व व्हाइस चेअरमन पदासाठी एक एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली या वेळी संचालक तुकाराम पांडुरंग खानसोळे, बालाजी माणिका मोरे, शिवाजी शंकरराव मोरे, गोविंद माणिकराव मोरे,प्रभाकर पंढरीनाथ थेटे,
बळीराम आंनदा मोरे, गोविंद अरजृना लामदाडे,कैलास भोजाजी लामदाडे,आंनदा नारायण अंबटवाड,शेषेबाई रावसाहेब लामदाडे,नंदा बाई काशिनाथ लामदाडे यांच्यी उपस्थिती होती, संरपच भिमराव लामदाडे , माजी संरपच काशीनाथ पाटील टाकळगावकर, ग्रामपंचायत सदस्य दता देवकांबळे, रामकिशन पांचाळ, गजानन मोरे,शंकरराव मोरे, व्यंकटराव खानसोळे,शिवहार लामदाडे ,ऊधदवराव खानसोळे,दिलीप मोरे, उत्तमराव थेटे , चक्रधर खानसोळे,यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक , युवक यांच्यी उपस्थिती होती. चेअरमन मोरे व व्हाइस चेअरमन थेटे यांच्या निवडीनंतर गावकऱ्यांनी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.