अर्धापूर, निळकंठ मदने| जे का रंजले कांजले त्यासी म्हणे आपुले,तेथेच देव जाणावा तेथेच साधू ओळखावा या संत वचनास अनुसरून शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामीण रुग्णालय तालुका अर्धापूर येथे दिनांक 20 जुलै 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय,अर्धापूर आणि तालुका आरोग्य अधिकारी ,अर्धापूर यांच्या वतीने दिव्यांगांना विशेष प्रमाणपत्र वाटप मोहीम व तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले होते. याशिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अपंगांना सहायता व्हावी यासाठी म्हणून दिव्यांग सहायता उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांगांना प्रमाणपत्र काढण्यासाठी सहाय्य केली.
दिव्यांगना नोंदणी साठी मार्गदर्शन करणे,त्यांना व्हीलचेअरवरून संबंधित डॉक्टर पर्यंत पोहचवणे, तसेच उचलून घेऊन, त्यांना डॉक्टरच्या कक्षपर्यंत तपासणी साठी घेऊन जाणे. अशा प्रकारचे सहाय्य या शिबिरातील दिव्यांगांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले. यामध्ये ओमकार सिनगारे ,कृष्णा तिळेवाड ,गणेश पटवे, आदित्य जडे ,प्रशांत क्षिरसागर, वर्षां मदने, मोनिका शिंदे, पल्लवी शिंदे या स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या सर्वांचे नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी प्रा. डॉ. रघुनाथ शेटे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.आनंद पाटील , तहसीलदार उज्वला पांगारकर,गटविकास अधिकारी मीना रावताळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विद्या झिने, आरोग्य अधिकारी डॉ.फिसके यांनी व दिव्यांगाणी रासेयो स्वयंसेवक व त्यांच्या संपूर्ण टीमच्या कार्याचे कौतुक केले.