नांदेड| जयराम अंबेकर विद्यालय अजार्पूर शाळे लगत असलेल्या साई टेकडीवर शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षांची लागवड केले. वृक्षारोपणाचा कार्यक्रम शाळेतील पाचवी ते दहावीतील वर्गातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने संपन्न झाला. यासाठी सामाजिक वनीकरण विभाग बिलोली यांच्याकडून रोपांचा पुरवठा करण्यात आला.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी रोपे लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. वृक्षारोपण ही काळजी गरज असून शाळेत चालू असलेल्या राष्ट्रीय हरी सेनेच्या माध्यमातून हे कार्यक्रम घेण्यात आले. यासाठी शासनाकडून जी निधी दिला जातो त्याचे योग्य पद्धतीने खर्च करून शाळा व शाळेचे परिसरामध्ये आजपर्यंत हजारो झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य या शाळेने केलेले आहे. या कामी सामाजिक वनीकरण विभाग कडून त्रीतारांकित व पंचतारांकित असे पुरस्कारही शाळेने मिळवलेली आहेत.
राष्ट्रीय हारीत सेना योजनेअंतर्गत कचरा निवारण, वृक्ष संवर्धन, संगोपन, प्रदूषण मुक्त सण साजरी करणे इत्यादी व यासारखे अनेक कार्यक्रम शाळेत घेतले जातात. या कामी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष देगलूरकर, जोशी, ढगे हनुमंत पवार ,तुकाराम पवार, शंकर बालके ,दत्ता पापुलवार, मुंगडे, स्वामी ,मोरे, चव्हाण, गंगाधर पापुलवार, राम देगावकर या सर्वांनी परीश्रम घेतले. शाळेत पर्यावरण पूरक कार्यक्रम घेतल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव पटणे, उपाध्यक्ष नंदाबाई पटणे, सचिव चंद्रशेखर पाटील, सहसचिव जयमाला पटणे यांनी संस्थेतील सर्व विद्यार्थी व कर्मचाºयांचे अभिनंदन केले.