तलाठी यांच्या सातबारावर व अभिलेख शाखेतील फेरफार नक्कलेवर शेतकर्यांना पिक कर्ज देण्यासाठी सर्व बँकाना आदेश द्या
मुखेड| मुखेड तालुक्यातील खरीप हंगामचे पिक कर्ज शेतकर्यास देण्यास टाळाटाळ करणार्या बँके वर कार्यवाहि करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी जिल्हाधिकारी डाँ.विपिन इटणकर हे मुखेड येथे आले असता त्यांची भेट घेवुन केली.
सध्या खरीप हंगाम सुरु असुन शेतकरी अगोदरच अतिवृष्टीने होरपळला असताना बँकेकडुन शेतकर्यांना डिजीटल सातबारा असेल तरच पिक कर्ज देण्यात येईल तलाठी यांच्या सातबार्यावर पिक कर्ज देता येणार नाही म्हणुन शेतकर्यांची अडवणुक होत असल्याची तक्रार शेतकर्यांना घेवुन मुखेड तहसिल कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्याकडे ढोसणे यांनी केली.तालुक्यातील बर्याच शेतकर्याचे सातबारे डिजीटल झाले नसल्याने त्यांना यांचा ञास सहन करावा लागत असल्याने त्या शेतकर्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप करावे.
अभिलेख शाखेतील फेरफार नक्कल असेल तरी पण बँका पिक कर्ज देत नसल्याचे ढोसणे जिल्हाधिकारी इटणकर यांच्या निर्दशनास आणुन देताच जिल्हाधिकारी यांनी संबधित पिडीत शेतकर्यांची यादी पाठवण्याचे सांगीतले असुन शेतकर्यांची हेळसांड करणार्या अशा बँके विरुध्द कार्यवाही करावी अशीही मागणी करण्यात आली.यावेळी सह्हायक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा,तहसिलदार काशीनाथ पाटील,नायब तहसिलदार महेश हांडे, विश्वनाथ अरण्ये,हाणमंत चव्हाण,नारायण देशमुख,वच्छलाबाई इंगळे,गफार शेख यांच्यासह शेतकरी ऊपस्थितीत हौते.
गेल्यावर्षीच एक हजार दोनशे शेतकर्यासाठी बँक आँफ बडोदा,मुखेड शाखेवर रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी हजारो शेतकर्यासह मोर्चा काढुन शेतकर्यांना न्याय मिळवुन दिला होता.त्या मोर्चाची धसकी घेत मुजोर बँक मँनेजरची बँक प्रशासनाने तात्काळ बदली केली होती.त्यामुळे शेतकर्यांची पिक कर्जा संदर्भात कागदपञासाठी अडवणुक करु नये.