तामसा सर्कलच्या वायपना गावात चोरट्यांचा धुमाकूळ; राधाकृष्ण मंदिरात चोरी; नागरिकांवर केली दगडफेक -NNL

तिघांना केली मारहाण; एकजण गंभीर तर दोघे किरकोळ जखमी; चोरट्यानी केला ऐवज लंपास 


नांदेड/हदगाव|
नांदेड जिल्ह्यातील हाफगाव तालुक्यात येणाऱ्या तामसा सर्कलमध्ये येणाऱ्या मौजे वायपना येथे पाऊस पडत असल्याच्या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांच्या टोळीने दि.१५ रोजीच्या मध्यरात्रीला धुमाकूळ माजविला असून, घरातील सदस्यांना मारहाण करून रक्तबंबाळ केले आहे. यात एकाला जर मारहाण झाली असून, दोघे किरकोळ जखमी आहेत. गावकरी उठतच चोरट्यानी येथील श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यानी १०  हजाराचा ऐवज लंपास केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हि घटना होते ना होते त्याच्या दुसऱ्या दिवशी हदगाव शहरातील एका श्रीमंत घरात दरोडा टाकून मारहाण करत ४० लाखाचा ऐवज लंपास केल्याने चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असल्याची चर्चा होते आहे. या टोळीचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हदगाव तालुक्यातील मौजे तामसा सर्कलमधील वायपणा येथे चोरट्यांनी दि.१५ च्या मध्यरात्री गावात शिरून काही घरात चोरी केली. गावातील कृष्ण मंदिरातील दानपेटीतील फोडून दान आलेल्या रक्कमेसह राधा - कृष्णाच्या मूर्तीवरील दागिने असा अंदाजे दहा हजाराचा ऐवज चोराला आहे. एवढेच नाहीतर काही घरात चोरीसाठी शिरण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला असता नागरिक जागे झाले. आणि त्यांनी आवाज करून शेजारच्या लोकांना उठविले हा प्रकार पाहून अज्ञात चोरट्यानी नागरिकांवर दगडफेक करून तिघांवर हल्ला केला. यात एक जण गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला आहे. तर २ जणांना किरकोळ मर लागला आहे. चोरट्यानी अश्या पद्धतीने धुमाकूळ घातला असल्याने गावातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार गावात एका भागाकडे नागरिक उठल्याने चोरट्यानी दुसऱ्या बाजूला असलेल्या राधा - कृष्ण मंदिराचे दोन्ही दरवाजे तोडून आत प्रवेश केला. आणि मंदिरातील दानपेटी फोडून राधा-कृष्णाच्या मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचे टोप, श्रीकृष्णाची चांदीची बासरी, चांदीचे कडे, तसेच राधेच्या डोक्यावरील चांदीचा टोप, गळ्यातील मनीमंगळसूत्र, चांदीचे कडे असा अंदाजे दहा हजाराचा ऐवज लंपास केला आहे. तसेच चोरट्यानी दानपेटी पळवून नेऊन त्यातील दानाची रकम घेऊन शेतामध्ये फेकून दिल्याचे पाहावयास मिळाले आहे. या ठिकाणी चोरट्यान विरोध केला असता कृष्ण मंदिराचे देवकर किशन धोंडीबा जमजाळ वय ७० वर्षे राहणार सावरगाव पिर तालुका मुखेड यांना चोरट्यांनी दगडाने डोक्यात जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर चोरट्यांनी गावातील धोंडीबा दुगाळे, श्रीकांत दुगाळे, कवीकर शिंदे, शंकर किशन दुगाळे यांना दगड फेकून मारून जखमी केले आहे.

१० ते १२ चोरट्यांच्या टोळीने हा सर्व प्रकार घडवून आणला असून, दगडफेक करत असल्याने चोरट्यांना पकडण्यासाठी कोणीही पुढं आले नाही. याच काळात लाईट नसल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याची माहिती मिळताच तामसा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे यांनी वायपना येथे भेट दिली. मात्र पोलीस येईपर्यंत चोरटे पळून गेले होते. त्यानांतर तामसा पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले. मात्र त्यांचा सुगावा लागला नाही. याबाबत राधाकृष्ण मंदिराचे देवकर धोंडीबा जमजळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी