नांदेड। गोदावरी अर्बन ही केवळ संस्था नसून, सामाजिक बांधिलकी जपणारी मराठवाड्यातील नामवंत संस्था आहे. अल्पावधीत नावा रुपाला आलेली ही संस्था समाजाच्या शेवटच्या घटकाला सोबत घेत त्यांना बचतची सवय लावण्याचे मोठे कार्य करते आहे. हे अभिमानास्पद आहे. त्यांमुळे हजारो कुटुंब आज बँके कडून कर्ज घेऊन स्वतःच्या उद्योग व्यवसायात पुढे जाण्याचे धाडस करत आहेत. अश्या या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर ‘डे’च्या निमित्ताने आम्हा डॉक्टरांचा सन्मान होतो. ही आम्हाला रुग्णसेवा करण्यासाठी बळ मिळवून देणारी बाब आहे. असा सूर उपस्थित सत्कार मूर्ती डॉक्टरांच्या तोंडून निघाला.
गोदावरी अर्बनच्या तरोडा नाका परिसरातील सहकारसुर्य या मुख्य शाखेच्या वतीने शनिवारी (ता.दोन) जागतिक डॉक्टर ‘डे’ साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक तथा हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्री पाटील, उपाध्यक्षा हेमलता देसले, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, संस्थेचे सचिव रविंद्र रगटे, सन्मानिय संचालक यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यालय मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे, मुख्यालय प्रिंसिपल मॅनेजर विजय शिरमेवार, मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक डॉक्टर्स ‘डे’च्या निमित्ताने शहरात अविरत रुग्णसेवा देणारे डॉक्टर्स यामध्ये बालरोग तज्ञ डॉ. जितेंद्र हुंडीवाला, डॉ. दत्तात्रय इंदूरकर, नांदेड सिटी डेंटल केअर अँड हॉस्पिटलचे डॉ. दत्ता मोरे, दंतरोग तज्ञ डॉ. कृष्णा इंदूरकर यांचा शाखेच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला व संस्थेच्या विविध सेवा सुविधांची माहिती देण्यात आली.
यावेळी शाखेचे शाखाअधिकारी अविनाश बोचरे, अतिष कोमटवार, मनोहर कांबळे, सुधाकर कंकाळ, सुजित घोरबांड, माधुरी हरसुलकर, अश्विनी खांडरे, राहुल चौधरी, अर्जुन हुरणे, अजय वंजारे, धनश्री अमृतवार, अश्विनी थडके, निकिता पंगीलवार, गुरुशरणकौर जेथरा, मोहितसिंग फौजी , जसप्रीतसिंग रामगडीया, फारुकी फशीयोद्दीन, गजानन येलमे, राम नरोटे, सुनील मोरे, श्रीकांत सोनाळे, सुमेध नगराळे, राजू वानखेडे, कोंडीबा राऊत, लक्ष्मण जोंधळे, प्रशांत बळवंते, संतोषी ठाकूर, तसेच शाखेचे सर्व दैनिक ठेव, आवर्त ठेव प्रतिनिधी उपस्थित होते.