इनामी जागेवरील अवैध अतिक्रमणावर न.पा.हातोडा पडणार
बिलोली। शहरातील ऐतिहासिक मस्जिद व दर्गा परिसरातील ईनामी अतिक्रमण बेकायदेशीर अतिक्रमण तत्काळ काढण्याचे आदेशाचे पत्र तहसीलदार यांनी मुख्याधिकारी नगर पालिका बिलोली यांना दिले आहे.
बिलोली शहरात ऐतिहासिक वक्फ व संस्था मस्जीद-ए-कला टोंब नवाब सरफराज खॉन शहिद मखबरा झुजागन नकारखाना कब्रस्तान( जामा मस्जिद) या नावाने परिसरात महाराष्ट्र राज्य वक्क मंडळाची ईनामी जमीन आहे.ज्याचा सर्व न.577,580 हा आहे.या जागेत दरवर्षी उर्स भरतो.उर्सनिमित्त येथे क्रिडांगणासाठी राखीव असलेले मैदान व पार्किंग जागेवर अनाधिकृतपणे झालेले बेकायदेशीर टिनशट,फंक्शन हाँल व दुकाने हे अतिक्रमण केलेले असून त्या अतिक्रमणामुळे ऐतिहासिक दगडी कोरीव मस्जिद व दर्गा ही दिसून येत नाही तर पर्यंटनला येणाऱ्या भाविकांना/श्रद्धालू/मुसल्लियान यांना त्रास सहन करावा लागत असून त्या जागेवरील सम्पूर्ण अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे.
यासाठी तहसील कार्यालय बिलोली समोर एजाज फारुखी, शेख.मुश्ताक,अहेमद अली खान यांनी दि.6 जुन रोजी आमरण उपोषणाला बसले होते. बिलोलि तहसीलदार यांनी त्या उपोषणाची दखल घेत या संदर्भात मुख्याधिकारी नगर पालिका अमोल चौधरी यांना पत्र देऊन अतिक्रमण परिसर हे नगर पालिकेचा हद्दीत येत असल्यामुळे मुख्याधिकारी यांनी त्या ईनामी जागेवरील केलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई तात्काळ करावी, आवश्यकता भासल्यास योग्य पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाइ करावी असे लेखी आदेशच दिले असून मुख्याधिकारी या बाबत काय निर्णय घेतात.व अतिक्रमण काढतात का? याकडे शहरातील श्रद्धालू/मुसल्लियान/जनतेचे लक्ष लागलेले आहे.