खासदार हेमंत पाटिल अडचनीच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी ; सरसकट सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी आग्रही -NNL


हिमायतनगर।
गेल्या आठवड्यात अतिवृष्टी, काही ठिकाणी ढगफुटी स्वरूपाचा पाऊस पडला यामुळे पुर परस्थिती निर्माण होवुन, पुराच्या पाण्यामुळे हजारो एक्कर जमीन बाधित झाली, परिणामी कोवळी पिके कोमेजुन गेली, यात शेतकऱ्याच मोठ नुकसान झाल आहे, खेडेगावाकडे जाणारे रस्ते खरडले, पुल खचले आहेत, पुराच्या नैसर्गिक आपत्तीने सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरही परीणाम झाला आहे, यातुन सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई म्हणुन सानुग्रह अनुदान मिळवुन देण्यासाठी आग्रही असल्याच खासदार हेमंत पाटिल यांनी सांगितल तशा सुचनाही खासदारांनी प्रशासकिय अधिकाऱ्यांना दिल्या, ते हिमायतनगर तालुक्यात दि. १६ शनिवारी पुर बाधित गावांच्या दौऱ्यावर होते. 

हिंगोली लोकसभा मतदार संघात मागिल आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हिमायतनगर तालुक्यातुन वाहनारी पैनगंगा नदि, कामारी क्याड, म्हसोबा नाला, कयाधु नदि, लहान मोठे ओढे दुथडी भरून वाहत होते, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातुन पुराचे पाणी वाहुन, साचुन पिके नष्ट झालीत, पशुधनांचीही हाणी झाली, कधी झिज भरून निघणार नाही अशा पध्दतीने जमिनी खरडुन गेल्या, अगोदरच शेतकऱ्यांनी दुबार, तीबार पेरणी करून खरीप हंगामाची लाव लागवड केली होती, खरीपाच्या सुरूवातीच्या टप्प्यातील बाळसे धरण्याच्या अवस्थेतील पिके कोमेजुन, वाहुन गेली, यामुळे बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे,  यातुन शेतकऱ्यांना धिर देवुन सावरण्यासाठी खासदार हेमंत पाटिल यांनी हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव ज., वडगाव ज. पळसपुर, डोल्हारी शिवारातील पिकांची पाहणी केली, सरसम , कामारी, दुधड, पोटा आदि गावांची स्थिती देखिल जानुन घेतली.


प्रारंभी खासदार पाटिल यांनी खैरगाव ज. महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच झालेल्या नुकसानीची पाहणी करून अधिकारी गुत्तेदाराला धारेवर धरले, पुलाच्या अर्धवट कामामुळे शेती खरडुन जाने हि बाब शेतकऱ्याला परवडनारी नाही त्यामुळे संबंधीत एजन्सीला जबाबदार धरून जेसीबी मशीनने खरडलेल्या जमिनीच सपाटीकरण करून देण्याच्या सुचना राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वडगाव ज. पुलाची उंची कमी असल्याने तात्काळ  पशुधनांच नुकसान झालेल्या पशुपालकास योग्य तो मावेजा देण्या संबंधी महसुली अधिकाऱ्यांना सांगितल एकुणच ज्या ज्यावेळी शेतकरी अडचनीत असतो तेंव्हा खासदार हेमंत पाटिल शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन प्रश्न लावुन धरतात.

सततच्या पावसामुळे ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे, अनेकांची भिंतीची डागडुजी करण्याची एैपत नसते त्यासाठी प्रत्येक घरपडीचा सर्वे तात्काळ करून मावेजा मिळवुन द्यावा, हे सर्व करीत असतांना कोणालाही जाणीव पुर्वक लाभा पासुन वंचीत ठेवु नये अशा सक्त सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या,  वडगाव, घारापुर, एकंबा, कौठा ज., कामारी, डोल्हारी, पळसपुर, आंदेगाव यासह तालुक्यातील विस गावांचा संपर्क पुर स्थितीत तुटला होता, यातील काही गावांना जानारे रस्ते खरडले आहेत, पुल क्षतीग्रस्त होवुन खचले आहेत, हा प्रकार त्या त्या विभागाच्या अभियंत्याच्या लक्षात आनुन दिला. तालुक्यातील वडगाव ज., पवना, दुधड, वायवाडी तलावाची सध्य स्थितीची माहिती अधिकाऱ्यां कडुन घेतली, आवश्यक त्या कामासाठी संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार करण्याच सांगितल. 

यावेळी उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटिल, माजी जिल्हा प्रमुख बाबुरावजी कदम, उपजिल्हा प्रमुख ज्योतीबा खराटे, तहसिलदार विजय अवधाने, माजी जी.प. सदस्य संभाराव लांडगे, बबनराव कदम, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, उपकार्यकारी अभियंता देवेंद्र तुंगेनवार, तालुका कृषी अधिकारी बि.ए. शेन्नेवाड, शहर प्रमुख प्रकाश रामदिनवार, सरपंच विशाल राठोड, दत्ता हंगरगे, राजेश जाधव, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, विलास वानखेडे, सत्यवृत्त ढोले, किसान सेनेचे ता.प्रमुख प्रकाशभिया जाधव, दिनेश जाधव, भाजपायुमो ता. अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, वामनराव मिराशे, गजानराव हरडपकर, ग्रापस लखन जैस्वाल, सरपंच लालसिंग जाधव, दिनेश सुर्यवंशी, दिनेश जाधव, यांच्यासह ग्रामस्थ शिवसैनिकांची उपस्थिती होती.

तसेच नायब तहसिलदार अनिल तामसकर, मंडळअधिकारी मनोज खंदारे, तलाठी पुरी, पुणेकर, गुट्टे .कृषी विभागाचे मंडळअधिकारी एम.एस. आडे, मंडळअधिकारी मारोती काळे, राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता पारीख, अभियंता वडजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मारोती डांगे, शा. अभियंता राहुल वाघमारे, शा. अभियंता सुनिल पोपुलवार, शासकिय गुत्तेदार एस.एस. पळशीकर., पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साईनाथ चिंतावार, पोलिस निरीक्ष भुसनुर, पो.कॉ. चोले, यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी