येवती मठ संस्थानमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती (लघु आळंदी ) येथे गुरुपौर्णिमा हजारो भक्त आणि पावसाच्या हजेरीत उत्साहाने साजरी करण्यात आली.

दि १३ जुलै रोजी बुधवारी सकाळी श्री सद्गुरु नराशाम महाराज यांच्या संजीवन समाधीस रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली . अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी गुरुचा आशीर्वाद आवश्यक आहे . त्यामुळे श्री सद्गुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले . गुरुवर्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती . नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . महाप्रसादाचे अन्नदाते ' पांडुरंग यन्नावार , देगलूर व भास्कर पाटील शिरूरकर होते . कार्यक्रम यशस्वीतासाठी अनेक भक्तांनी प्रयत्न केले .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी