अर्धापूर, निळकंठ मदने| ग्रामविकासाच्या कामात सरपंच हे पद अत्यंत महत्वाचे असून,महिला सरपंचांनी याकामी प्रत्यक्षात समोर यावे,गावाचा विकास करण्यासाठी सरपंचांची भुमीका, सकारात्मक कामाची पध्दत , शैक्षणिक, आरोग्य विभाग गावागावात सक्षम करण्यासाठी सरपंच हा घटक अत्यंत महत्वाचा असल्याचे शारदा भवनच्या उपाध्यक्षा माजी आमदार अमीता चव्हाण यांनी अध्यक्ष स्थानावरुन प्रतिपादन केले.
कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी अर्धापूरात डॉ शंकरराव चव्हाण महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सिनेअभिनेते अनिल मोरे, संचालक उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य रावसाहेब शेंदारकर, संचालक नरेंद्र चव्हाण, शामराव टेकाळे, छत्रपती कानोडे, प्रविण देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी कै. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी"ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्था नेतृत्वाची भुमीका" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अमिता चव्हाण म्हणाल्या कि,महिला सरपंच, नगरसेविका,पं.स.व जि.प. सदस्या यांनी प्रत्यक्ष सर्व कामकाजात सक्रिय सहभाग घ्यावा,पतीराजांनी याकामी सहकार्य करावे लोकप्रतिनिधी महिला सक्षम झाल्यास निश्चितच खऱ्या अर्थाने तेव्हा विकास होईल,बचत गटासह आदि क्षेत्रात आता महिला पुढे आहेत, अनिल मोरे म्हणाले कि,देशात पंतप्रधान, राज्यात मुख्यमंत्री व गावात सरपंच हेच देशातील सर्वात मोठे पद आहेत.
यापदाची आपल्या पारदर्शक कामातून सरपंचांनी गरीमा राखावी,गावचा दक्ष सरपंच झाल्यास त्या गावाचा विकास कोणीच रोखू शकणार नाही,पालक मेळावा, सरपंचाचा गावात मुक्काम, आरोग्य विभाग सज्ज ठेवल्यास गाव सुधारेल असे ते म्हणाले.प्राचार्य शेंदारकर म्हणाले कि, महाविद्यालय समाज उपयोगी व्हावे यासाठी सामाजिक कामात हे महाविद्यालय असल्याने अ दर्जाचे मानांकन महाविद्यालयाला मिळाले,गावाला वेळ देऊन शासकीय योजनांचा गावातील नागरीकांसाठी फायदा करून द्यावा. नरेद्र चव्हाण म्हणाले, सरपंचांनी आपापल्या गावातील माती परीक्षण मोफतमध्ये करुन घेतल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, गावातील पिण्याचे व सिंचनाचे पाण्याचे नियोजन अत्यंत महत्वाचे आहे.उदय निंबाळकर म्हणाले कि, ग्रामविकास करण्यासाठी सरपंच चांगला असेल तरच गाव चांगले चालते.
त्यासाठी कारभारी सक्षम असणे महत्त्वाचे आहे.प्राचार्य के के पाटील म्हणाले कि, ग्रामविकास झाल्यास खऱ्या अर्थाने शिक्षणाचा फायदा होईल,यापुढे महाविद्यालयाच्या वतीने सरपंच परिषद ठेवण्याचा महाविद्यालयाचा मानस असल्याचे म्हणाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा काझी मुख्तारोदीन , प्रस्तावित प्राचार्य के के पाटील आभार कार्यक्रमाधीकारी प्रा.डाॅ.रघुनाथ शेट्टे यांनी मानले.यावेळी शामराव पाटील, मुसव्वीर खतीब, निळकंठ मदने, डॉ विशाल लंगडे, व्यंकटी राऊत,दादाराव शिंदे, अनिल इंगोले, दतराव नादरे, इंगळे,भगवान कदम, अमोल इंगळे, जिजाबाई कांबळे,चांदू कांबळे,दता नवले, अजेरखान पठाण, अनिल थोरात, भाऊराव हाक्के,प्रीया धुमाळ, अनिल धुमाळ,सौ.गोदरे,सौ.सुर्यवंशी, सुर्यवंशी दाभडकर यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.