माहूरमध्ये विषारी औषध पिवून तर मुक्रमाबाद येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या -NNL


नांदेड|
जिल्ह्यात एकाच दिवशी दोन तालुक्यातील शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारील कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्यात माहूरमधील शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली तर मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत. यामुळे नवीन सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात यश येत नसल्याचे यावरून दिसते आहे. आतातरी शासनाने अतिवृष्टीने नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन पुढील काळात आत्महत्या करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना वाचवावे अशी अपेक्षा जनमाणसातून व्यक्त होते आहे.   

यंदा मागील १० दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला. मागल्या वर्षाची सरासरी गाठून अल्पकाळात जादा पाऊस झाल्याने नदी - नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून, दुबार - तिबार पेरणी करूनही निसर्गाच्या प्रकोपाने पूर्णतः नागवला गेल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. मागील २३ दिवसाच्या काळात महाराष्ट्रात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात एकट्या मराठवाड्यात ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नवीन सरकारला मंत्रिमंडळ स्थापन करण्यात उशीर होत असल्याने सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यास विलंब होतो असल्याचे सांगितले जात आहे. आता लवकरच हा तिढा संपणार असल्याचे सांगितले जात असताना दि.२३ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.    

यामध्ये माहुर तालुक्यातील लिंबायत नवे येथील शेतकरी माधव नामदेव जाधव, वय ५५ वर्षे, रा. यांनी शेताची दुबार पेरणी व बॅकचे कर्जामुळे चिंताग्रस्त होवून कोणतेतरी विषारी औषध पिवून आत्महत्या केली. तातडीने शेतकऱ्यास शासकीय रुग्नालयात दाखल केले मात्र उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अशी खबर पंडीत माधव जाधव वय ३५ वर्षे यांनी दिल्यावरुन माहुर पोलीस डायरीत कलम १७४ सीआरपीसी कायदा प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार राठोड हे करीत आहेत.

तर नांदेड जिल्ह्यातील दुसरी घटना मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील शेतकरी बालाजी पुंडलिकराव गुमडे, वय ४० वर्षे, यांनी दि.२३ रोजी राहत्या घरी सतत होणार्‍या नापिकी व कर्ज बाजारी झाल्यामुळे हातबल होवुन गळफास घेवुन आत्महत्या केली. अशी खबर शिल्पा बालाजी गुमडे, वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. मुक्रमाबाद हिने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्रमाबाद पोलीस डायरीत कलम १७४  सीआरपीसी कायदा प्रमाणे नोंद करण्यात आली. या घटनेचा तपास पोलीस हवालदार आडेकर हे करीत आहेत. एकच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे दिसते आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी