नांदेड| भारतीय रेल्वे मध्ये आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज दिनांक 25 जुलै, 2022 रोजी नांदेड रेल्वे स्थानकावर एल.ई.डी. लावलेला ट्रक चे उद्घाटन करण्यात आले. या एल.ई.डी. ट्रक द्वारे नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर जावून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ने वर्षभर संपूर्ण भारतीय रेल्वे मध्ये केलेल्या चांगल्या कार्याचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
श्री नागभूषण राव, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी आज नांदेड रेल्वे स्थानकावर या एल.ई.डी. लावलेल्या ट्रक ला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. या वेळी सहायक सुरक्षा आयुक्त श्री मिर्धा आणि इतर आर.पी.एफ. चे कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.