प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी भारत सोनकांबळे यांची निवड -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
गेल्या अनेक वर्षापासून मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील निर्भीड व धाडसी पत्रकार भारत सोनकांबळे हे आपल्या मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था,बेटमोगरा ता.मुखेड जि.नांदेड या संस्थे अंतर्गत रमाई फाउंडेशन च्या माध्यमातून महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी दि.७ फेब्रुवारी रोजी बेटमोगरा येथे व्याख्याने,आरोग्य शिबीरे, पत्रकारांचे सन्मान सोहळे इत्यादी सामाजिक कार्य करीत असतात. त्याचबरोब पत्रकारीता क्षेत्रामध्ये ही दै.लोकप्रश्न, दै.युवाराज्य, दै.कुलस्वामिनी संदेश या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून व स्वाभिमान भारत न्यूज च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपतात.

आणि उपेक्षित आणि वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आपले हे पत्रकारितेचे हत्यार उपसून सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे टाकून समाजाच्या उत्थानासाठी आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी आपली लेखणी झिजवून वंचीतांना व अन्यांयग्रस्तांना न्याय मिळवून दिले आहेत. ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेवून त्यांची दि.२३ जुलै २०२२ रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी निवड जाहीर केली. भारत सोनकांबळे यांनी या अगोदर दोन वेळेस बिनविरोध प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुखेड तालुका अध्यक्ष म्हणून आपले कार्य उत्तमरीत्या पार पाडले.

भारत सोनकांबळे संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, 

युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, उत्तर महाराष्ट्र संघटक साहेबराव बाबर, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, सह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने ही निवड जाहीर करण्यात आली आहे. 

त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कार्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड,माजी आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. अविनाशराव घाटे,माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,माजी जि.प. सदस्य बळवंत पाटील बेटमोगरेकर, माजी जि.प.सदस्य तथा फुले,शाहू,आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते दशरथराव लोहबंदे, वं.ब.आ.चे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष के.एच.हसनाळकर,फुले,शाहू,आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रा. उत्तमकुमार कांबळे, डॉ.शिवाजी कागडे,माजी नगरसेवक राहुल लोहबंदे,डॉ.राहुल कांबळे, फुले, शाहू, आंबेडकर क्रांती मंच चे भास्कर भेदेकर,गौसभाई रामातिर्थकर,सुनील कांबळे,नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार,प्रा.अखील येवतीकर, पत्रकार दत्तात्रय कांबळे, पत्रकार रणजित जामखेडकर, पत्रकार विजय बनसोडे,संदीप कांबळे, धम्मानंद भेडेकर यांच्या सह तालुक्यातील विविध क्षेत्रातील अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी