महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिनव उपक्रम
नांदेड| भारताचे माजी गृहमंत्री, मराठवाड्याचे आधुनिक भगीरथ श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त बाबानगरमधील महात्मा फुले हायस्कूलमधील सकाळ विभागात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
काेराेना काळातील दाेन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षे सुरु झाले. दाेन वर्षानंतर शाळेत प्रत्यक्ष हजर झालेल्या विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्या शारिरीक आणि मानसिक, बाैद्धीक विकासाला चालना देण्यासाठी बाबानगरच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन नेहमी केले जाते. याच पार्श्वभूमीवर नुकतेच श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने रांगाेळी आणि चित्रकला स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले हाेते. सकाळच्या सत्रात आयोजित केलेल्या निबंध व रांगोळी स्पर्धेत 622 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विशेषतः विद्यार्थ्यांसाठी 'अभिनव चित्रकला स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते. या विशेष चित्रकला स्पर्धेतून डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाला आदरांजली अर्पण करण्यात आली. या सर्व स्पर्धा आणि उपक्रमांसाठी शाळेचे मुख्याध्यापक एस. के. तायडे, पर्यवेक्षक एस. एन. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कलाध्यापक के. एम. राखेवार, साै. एस. एन. पेंडलवार, सौ. के. बी. कोथळकर आणि इतर सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.